जामखेड न्युज——
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांचे कर्तृत्व बहुआयामी डॉ. सुनिल वराट

तालुक्यात बाळासाहेब धनवे हे गटशिक्षणाधिकारी पदावर हजर झाल्यापासून चांगले शैक्षणिक वातावरण तयार होऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढ होताना दिसत आहे. धनवे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असून त्यांच्या अनुभवाचा फायदा जामखेडची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नक्कीच होईल प्रतिपादन डॉ. श्री .सुनिल वराट यांनी केले आहे .

गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांचा वराट हॉस्पिटल मध्ये सत्कार करण्यात आला. धनवे हे मोठ्या पदावर जाऊनही जून्या मित्रांना विसरत नाहीत ही आनंदाची बाब आहे.
यावेळी डॉ. अविनाश पवार यांनाही तालुक्यात शैक्षणिक कामकाज चांगले चालू असून अशीच प्रगती व्हावी अशा शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष व केंद्रप्रमुख नारायण राऊत व इतर मान्यवर उपस्थित होते .









