जामखेड न्युज——
जामखेड मधील रिलायन्सच्या स्मार्ट पाँइट माँलमधे निकृष्ट प्रतिचा माल, ग्राहकांच्या आरोग्यचा प्रश्न
संपूर्ण देशात दर्जा व गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या रिलायन्स उद्योग समुह याच उद्योग समुहाच्या जामखेड येथील स्मार्ट पाँइट माँलमधे काही वस्तू या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या आहेत. काही ड्रायफ्रुटच्या पाकिटात तर किडे तसेच अत्यंत दुर्गंधी युक्त माल आहे. सुज्ञ ग्राहकांनी तक्रार केली तर माल बदलून दिला जातो. पण सर्व सामान्य लोक मात्र शांत राहतात अशा मालामुळे ग्राहकांच्या आरोग्यचा प्रश्न निर्माण झाला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
असेच एका ग्राहकांने मिक्स ड्रायफ्रुटचे 500 ग्रॅम पाकिट 285 रूपयास सोमवारी खरेदी केले घरी आल्यावर ते फोडले तर यातील जर्दाळू फोडल्यावर ते खराब निघाले एका जर्दाळू मध्ये किडे निघाले तसेच काजूचा तर खूपच घाण वास येत होता. संपूर्ण पाकिटाचा वास घेतला तर घाण वास येत होता. ग्राहकांने जामखेड स्मार्ट पाँइटचे व्यवस्थापक अमय जोशी याना फोटो पाठवले तेव्हा त्यांनी सांगितले की, बील व पाकिट घेऊन या आम्ही बदलून देतो. सुज्ञ ग्राहकांला बदलून मिळाले पण सामान्य ग्राहकांचे काय असा प्रश्न उभा राहिला आहे.
लोक हजारो रुपये खर्च करून माल खरेदी करतात पण जर माल खराब निघाला तर अनेक वेळा दुकानदार बोलू देत नाहीत. खराब मालामुळे ग्राहकांच्या आरोग्यचा प्रश्न निर्माण झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाने ताबडतोब अशा दुकानदारांवर कारवाई करावी अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.
ड्राय फ्रुट च्या पाकिटावर एक्सपायरी डेट आहे पण त्या आगोदरच हे पाकिट खराब कसे काय होतात असा प्रश्न निर्माण झाला आहे.