जामखेड न्युज——-
शेतकरी ग्रामविकास आघाडीचे आशिर्वाद रँलीच्या रूपाने जोरदार शक्तिप्रदर्शन
जवळा ग्रामपंचायत रणधुमाळी सुरू
तालुक्यातील जवळा ग्रामपंचायत निवडणूक जाहीर जाहीर झाली असल्याने जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. याच अनुषंगाने आज शेतकरी ग्रामविकास आघाडी जवळा यांची आशिर्वाद रँली संपन्न झाली. यामध्ये सर्व पक्षीय नेते व कार्यकर्त्यांसह मोठी गर्दी होती. यामुळे निवडणूकीआधीच शेतकरी ग्रामविकास आघाडीने मैदान जिंकले असे बोलले जात आहे.
कै. श्रीरंग भाऊ कोल्हे, कै. किसनराव दळवी, कै. प्रदिप (आबा) पाटील यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन जवळा गावच्या विकासासाठी शेतकरी ग्रामविकास आघाडी स्थापन करण्यात आली आहे. आज घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर जगदंबा मंदिरापासून रँली सुरूवात झाली यावेळी मोठ्या संख्येने सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते व ग्रामस्थ हजर होते. कार्यकर्त्यांनी मतदारांचे आशिर्वाद घेतले. मतदारांचे आशिर्वाद घेण्यासाठी गावात रँली संपन्न झाली यावेळी गर्दीचा उच्चांक होता. मतदारांचा उत्फुर्त प्रतिसाद सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
जवळा गावच्या विकासासाठी सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते यांनी एकत्र येत जवळा ग्रामविकास शेतकरी आघाडी स्थापन केली आहे. आजच्या रँलीत शेतकरी, व्यापारी व सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रँली पाहता ग्रामपंचायत रणधुमाळी सुरू झाली असे बोलले जात आहे.