जामखेड न्युज——
अतुल दळवी यांना पितृशोक, उद्धव दळवी यांचे अल्पशा आजाराने निधन
श्री साकेश्वर विद्यालयातील कर्मचारी अतुल दळवी यांचे वडील उद्धव दगडू दळवी (वय ७७) यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. दुपारी चार वाजता साकत येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे.
उद्धव दळवी हे धार्मिक वृत्तीचे होते आज एकादशी दिवशी सकाळी ८.१५ वाजता राहत्या घरी निधन झाले. पंधरा दिवसांपुर्वी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने जामखेड येथील खाजगी दवाखान्यात नेले होते. नंतर आठ दिवसांपूर्वी नगरला दवाखान्यात हलवले होते. सोमवारी रात्री घरी आणले होते. आज मंगळवार सकाळी दि. ८.१५ वाजता निधन झाले. दळवी कुटुबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
उद्धव दळवी हे सात भाऊ होते दोघे साकत येथे, दोघे नगर येथे, एक आळंदी, एक मुंबई तर एक औरंगाबाद येथे होते यातील नगर येथील ज्ञानेश्वर दगडू दळवी यांचे बारा वर्षापुर्वी निधन झाले होते. एक भाऊ भागवत महाराज दळवी हे नगर येथे आहेत. आणि आता उद्धव दगडू दळवी यांचे निधन झाले आहे.
त्यांच्या मागे दोन मुले अतुल व विवेक, एक मुलगी, पत्नी, पाच भाऊ, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.