मराठा आरक्षणाचे प्रश्न सरकार दरबारी मांडणार – आमदार प्रा. राम शिंदे मराठा क्रांती मोर्चा जामखेड तालुक्याच्या वतीने आमदार शिंदे यांना निवेदन

0
518

जामखेड न्युज——

मराठा आरक्षणाचे प्रश्न सरकार दरबारी मांडणार – आमदार प्रा. राम शिंदे

मराठा क्रांती मोर्चा जामखेड तालुक्याच्या वतीने आमदार शिंदे यांना निवेदन

 

 

जामखेड शहरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने भव्य दिव्य अशी मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते यासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. सहा आँक्टोबर रोजी मनोज जरांगे पाटील हे भूम येथून खर्डा येथे आले या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. खर्डा येथून चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळाचे दर्शन घेतले यावेळी आमदार प्रा. राम शिंदे व प्रा. सचिन गायवळ यांच्या सह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.


पुढे अरणगाव, डोणगाव, जामगाव मार्गी आष्टी येथे सभा झाली यानंतर जामखेड शहरात भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण करण्यात आली.

जामखेड येथे आयोजित मराठा आरक्षण जागर सभेनिमित्त मराठा योद्धा श्री.मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी आजच्या या सभेकरिता असंख्य मराठा बांधव सहभागी झाले होते. तसेच आमदार प्रा राम शिंदे साहेब हे देखील सहभागी झाले होते. या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षण तसेच विविध मागण्यांचे निवेदन हे आमदार प्रा राम शिंदे यांना देत एक जबाबदार लोकप्रधिनी म्हणून समाजाचे प्रश्न हे सरकार दरबारी मांडावेत व समाजातील गरीब युवकांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी आरक्षण किती गरजेचे आहे याची जाणीव करून द्यावी याकरिता हे निवेदन देण्यात आले. शिंदे देखील या ठिकाणी सर्वांना आश्वस्त करत आपण सरकार दरबारी आपल्या मागण्या मांडण्याकरिता कटिबद्ध आहे असे आश्वासन दिले.

प्रसंगी उपस्थित प्रा सचिन सर गायवळ, आण्णासाहेब सावंत, डाॅ भगवान मुरुमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, रवी सुरवसे, बापु ढवळे, पवन राळेभात, सोमनाथ राळेभात, बिभिषन धनवडे, राहुल उगले, दिंगांबर चव्हान, विजयसिंह गोलेकर, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here