जामखेड न्युज——
मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही – मनोज जरांगे पाटील
मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय तुमच्या सर्वाच्या सहकार्याने आपण सरकारला सुट्टी देणार नाही. मराठा व कुणबी एकच आहेत सरकारला पाच हजार पुरावे दिले आहेत. त्यामुळे आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
आज जामखेड शहरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने भव्य दिव्य अशी मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते यासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. आज सहा आँक्टोबर रोजी मनोज जरांगे पाटील हे भूम येथून खर्डा येथे आले या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. खर्डा येथून चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळाचे दर्शन घेतले यावेळी आमदार प्रा. राम शिंदे व प्रा. सचिन गायवळ यांच्या सह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते यांनी स्वागत केले पुढे अरणगाव, डोणगाव, जामगाव मार्गी आष्टी येथे सभा झाली यानंतर जामखेड शहरात भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण करण्यात आली.
यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारने एक महिन्याची मुदत मागितली होती. आपण दहा दिवस जास्त दिले आहेत. आता सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. आमचे आंदोलन चिरडण्याचा सरकारने खुप वेळा प्रयत्न केला पण त्यांचे डाव त्यांच्यावरच उलटवले. मराठा व कुणबी एकच आहेत असेही सांगितले.
१४ तारखेला आंतरवलीला या पुढे दहा दिवस आहेत आपली ताकद आपण सरकारला दाखवू कोणीही आत्महत्या करू नका शांततेत या आणी जा असे आवाहन केले. तसेच आरक्षण मिळाल्यावर एक दिवस जामखेड मध्ये जाहीर सभा घेऊ असेही सांगितले.
तीन वाजता असणारी सभा साडेआठ वाजता सुरू झाली तरीही मोठ्या प्रमाणावर श्रोते हजर होते. जामखेड शहरासह तालुक्यात मनोज जरांगे पाटील यांचे ठिक ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले.
मुस्लिम समाजाच्या वतीने मराठा आरक्षणास जाहीर पाठिंबा देण्यात आला, लहान मुलांच्या हस्ते पांठिब्याचे पत्र देण्यात आले. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्यावर डॉक्युमेंटरी दाखविण्यात यावी
सभेचे आयोजक प्रदिप सोळुंके यांनी आंतरवली सराटी येथील सभेसाठी जामखेड करांना आमंत्रण दिले १४ तारखेला दिडशे एकर जागेवर जाहीर सभा होणार आहे असे सांगितले.
सभास्थळी आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन जिजाऊ वंदन करण्यात आले.
शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच अनेक चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. निलेश दिवटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.