जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज ( सुदाम वराट) –
शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद यांनी श्री शैल्यम मंदिराची साफसफाई करून मंदिराचा जीर्णोद्धार केला तसेच मंदिर परिसरात वृक्षारोपण केले व भाविक भक्तांना बसण्यासाठी बाकडे टाकली आता मंदिर परिसरात गवत वाढल्याने स्वत: फवारणी केली याामुळे परिसरातील भाविक भक्तांनी संजय काशीद यांना धन्यवाद दिले आहेत.

८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या तत्त्वावर शिवसेना काम करत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपर्क प्रमुख संजय घाडी, सहसंपर्कप्रमुख डॉ.विजय पाटील व जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी यांच्या आदेशानुसार शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद हे नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असतात.

श्रीशैल्यममल्लिकार्जुन मंदिर परिसरात संजय काशीद यांनी वाढदिवसानिमित्त मंदिराचा जीर्णोद्धार करत परिसरात वृक्षारोपण केले होते. आता परिसरात गवत वाढल्याने तण नाशकाची स्वत : हातात पंप घेऊन फवारणी केली आहे त्यामुळे परिसरातील लोकांनी काशिद यांना अनेक धन्यवाद दिले आहेत.
शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद हे समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असतात त्यांनी शहरातील प्रभाग 18 व 14 मध्ये पाणी टंचाईच्या काळात मोफत टॅंकरने पाणीपुरवठा, अनेक ठिकाणी मुरमीकरण करून रस्ते केले, गटारे केले, अनेक ठिकाणी लोकांना बसण्यासाठी बाकडे टाकले आहेत. तसेच लाईटचाही प्रश्न सोडविला आहे. शहरातील पुरातन मंदिर असलेल्या श्रीशैल्यममल्लिकार्जुन मंदिर परिसरात दगड मातीचे मोठ्या प्रमाणावर ढिगारे, काटेरी झुडपे होती काशिद यांनी जेसीबीच्या साहाय्याने सर्व साफसफाई केली व मंदिर परिसरात झाडे लावली व झाडांना पाणी घालण्यासाठी एक टॅकर तेथे ठेवला आहे. वाढदिवसानिमित्त त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला वृक्षारोपण केले व आता मंदिर परिसर चकाचक राहावा म्हणून तणनाशक फवारणी केली आहे.