जामखेड न्युज——
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व भटके-विमुक्त आदिवासी समाजाला नागरिकत्वाचे पुरावे देणार – श्रीकांत देशपांडे मुख्य निवडणूक अधिकारी
अहमदनगर जिल्ह्यातील भटके-विमुक्त, आदिवासी, तृतीयपंथी यांना नागरिकत्वाचे पुरावे मिळाले पाहिजे जातीचा दाखला, रेशन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड, घरकुल, यशवंतराव चव्हाण वसाहत योजना, संजय गांधी निराधार योजना या सर्व योजना घरपोहोच मिळाल्या पाहिजेत. यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील भटके-विमुक्त आदिवासी, तृतीयपंथी यांच्यासोबत अहमदनगर जिल्ह्यात काम करणाऱ्या संस्था, संघटना, व्यक्ती, समाजसेवक, पदाधिकारी यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे काल 15/ 9 /2023 रोजी दुपारी 4:00 वाजता मा.देशपांडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व विविध शासकीय कार्यालयाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हि बैठक पार पडली यावेळी सामाजिक न्याय विभाग अहमदनगर यांच्यावतीने भटके- विमुक्तांच्या विकासासाठी 14 कलमी कार्यक्रम तयार केला गेला आहे.
गेली चार महिन्यापासून अहमदनगर जिल्ह्यातील भटके विमुक्तनां मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे काम चालू आहे, यासाठी मा. समाज कल्याण प्रादेशिक आयुक्त माधवजी वाघ साहेब व अहमदनगर जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे साहेब हे काम करत आहेत या बैठकीमध्ये विविध उपक्रमाची योजना नागरिकत्वाच्या पुराव्यांची माहिती देशपांडे साहेबांना देण्यात आली तसेच एकल परीतक्ता महिला, तृतीयपंथी,भटके विमुक्त, आदिवासी यांच्या अडी-अडचणी वरती चर्चा करण्यात आली.
याबैठकीस मा.ॲड. डॉ अरुण जाधव भटके विमुक्त आघाडीचे राज्य समन्वय,मा. राहुल पाटील उपजिल्हा निवडणूक अधिकारी, मा. राधाकिसन देवढे साहेब सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अहमदनगर,मा. प्रदीप पाटील निवडणूक तहसीलदार,मा. गणेश राठोड प्रांत अधिकारी श्रीगोंदा पारनेर, प्रसाद मते प्रांत अधिकारी पाथर्डी शेवगाव, संजय शिंदे तहसीलदार अहमदनगर, अनिल जाधव, तुकाराम पवार, लता सावंत, द्वारका पवार, उज्वला मदने, बाबासाहेब महापुरे, छाया नवले, राहुल पवार, वैशाली काळे, सचिन काळे, संतोष चौळगे, आबा कदम, आदी भटके विमुक्त आदिवासी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. अशी माहिती तुकाराम पवार यांनी दिली