जामखेड न्युज——
बैल मालकास पैसे देऊन कसायाच्या ताब्यातून केली नंदीबैलाची सुटका
पांडुराजे भोसले यांच्या पुढाकाराने बैलाची गोशाळेत रवानगी
आज शनिवार दि.१६/९/२०२३ रोजी सकाळी जामखेड येथील बैलबाजारामध्ये कडा कारखाना येथील आनिल भिसे यांनी त्यांचा नंदीबैल कसायांना विकत असताना त्यास जागेवर धरुन जामखेड पोलिस स्टेशनचे काॅन्स्टेबल साठे मेजर, गंगे मेजर यांच्या मदतीने तो नंदीबैल पोलिस स्टेशन येथे आणुन सदर नंदीबैल मालकास ८०००/— रुपये देऊन नंदीबैलाची सुटका करुन श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अध्यक्ष श्री.पांडुराजे भोसले यांचे मार्फत रुक्मिणी माता गोशाळा मुळेवाडी ता कर्जत येथील गोशाळेत सुखरुप रवाना करण्यात आला.
यावेळी रमेश दादा आजबे,अँड प्रविण सानप, लक्ष्मण राळेभात, पिंटु रसाळ, ढेरे मेजर यांनी अर्थिक सहकार्य केले.
यावेळी रमेश (दादा) आजबे यांनी सर्व गोरक्षकांना आश्वासन दिले की लवकरात लवकर २० एकरात गोमातेसाठी सर्व सुविधा उपलब्ध करु सदर गोशाळा निर्माण करुन कत्तलखान्या पासुन गाई वाचवुया हाच हेतु गोशाळेचा असेल असे सांगितले. यावेळी मानद पशु कल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांची मदत मिळाली शिवप्रेमीं धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.