अट्टल पाकिटमारे व सोन्याची चैन मारणारे दोन आरोपी जामखेड पोलिसांकडून जेरबंद, मुद्देमाल ही हस्तगत

0
318

जामखेड न्युज——

अट्टल पाकिटमारे व सोन्याची चैन मारणारे दोन आरोपी जामखेड पोलिसांकडून जेरबंद, मुद्देमाल ही हस्तगत

 

गर्दीच्या ठिकाणी घुसून पाकिटमारी व सोन्याची चैन मारणारे अटल दोन आरोपी जामखेड पोलीसांनी अटक करत काही मुद्देमालासह हस्तगत केला आहे. दोन आरोपींची चौकशी करता दोन्ही आरोपी अटल पाकिटमारे व चैन मारणारे असून अनेक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पाकिटमारे पकडल्यामुळे जामखेड पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.

मागील आठवड्यात पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा खर्डा चोक जामखेड येथे असताना
माझ्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची चैन चोरली अशी फिर्याद सुहास दादासाहेब वारे वय ४० वर्षे, रा. रत्नापूर ता. जामखेड यांनी ९ सप्टेंबर रोजी फिर्याद जामखेड पोलीस स्टेशनला दाखल केली होती.

सदर गुन्ह्याचा तपास चालु असताना सदर ठिकाणी खर्डा चौक येथे लोकांचे गर्दीमध्ये लोकांचे खिसे, पाकीट तपासताना दोन संशयित इसमांना ताब्यात घेऊन चौकशी कामी जामखेड पोलीस स्टेशनला आणुन विचारपुस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देवु लागले त्यांचेकडे अधिक सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे

१) दत्ता ज्ञानेश्वर गुंजाळ वय ३२ वर्षे,
२) अशोक बबन जाधव वय २९ वर्षे
दोघे रा.पेठ बीड ता. जि. बीड असे नसल्याचे सांगितले.

त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना दि.०९/०९/२०२३ रोजी सदर गुन्ह्यात अटक करुन पोलीस कस्टडी रिमांड घेवुन ते आज पावेतो पोलीस
कस्टडी मध्ये आहेत. त्यांचेकडुन गुन्ह्यात चोरीस गेलेली अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन अंदाजे
सव्वा लाख रुपये किंमतीची हस्तगत केली आहे.

अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

आरोपी नामे दत्ता ज्ञानेश्वर गुंजाळ वय ३२वर्षे, रा. बलभिमनगर, पेठ बीड ता. जि. बीड याचे विरूध्द दाखल गुन्हे खालील प्रमाणे

१) चिंचणीवांगी पोलीस स्टेशन गु.र.नं. २२/२०१८ भादवि कलम ३७९ प्रमाणे
२) कारंजासीटी पोलीस स्टेशन गु.र.नं. १२० / २०१६ भादवि कलम ३७९, ३४ प्रमाणे

३) निलंगा पोलीस स्टेशन गु.र.नं. ४३ / २०१६ भादवि कलम ३७९ प्रमाणे

४) गांधीचौक पोलीस स्टेशन, लातुर गु.र.नं. २०३/२०१३ भादवि कलम ३७९ प्रमाणे

५) हिंगोली तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं.३४/२०१४ भादवि कलम ३७९ प्रमाणे

६) उस्मानाबाद सिटी पोलीस स्टेशन गु.र.नं. ४९/२०१० भादवि कलम ३७९ प्रमाणे

७) हिंगोली तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. १७७/२०११ भादवि कलम ३७९ प्रमाणे आहेत तर

आरोपी नामे अशोक बबन जाधव वय २९ वर्षे, रा.पेठबीड ता. जि. बीड याचे विरूध्द दाखल गुन्हे १) बीड ग्रामीण पोलीस स्टेशन गु.र.नं. १४८/२०२१ भादवि कलम ३९९,४०२, आर्म अॅक्ट ४ / २५ प्रमाणे
२) पंचवटी पोलीस स्टेशन, नाशिक गु.र.नं. ३४९/२०१६ भादवि कलम ३७९, ३४ प्रमाणे
३) कोतवाली पोलीस स्टेशन, अहमदनगर गु.र.नं. ४९८/२०१९ भादवि कलम ३७९,२३४ प्रमाणे
गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश पाटील, पो.हे.कॉ. प्रविण इंगळे, पो.ना. संतोष कोपनर, पो. ना. अविनाश ढेरे, पो.कॉ. प्रकाश मांडगे, पो.कॉ. देविदास पळसे, पो.कॉ. कुलदिप घोळवे यांनी केली आहे.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ प्रविण इंगळे हे करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here