जामखेड न्युज——
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जामखेड तालुकाध्यक्षपदी नवनाथ बहिर यांची निवड
तालुक्यातील आदर्श व उपक्रमशील शिक्षक नवनाथ बहिर यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जामखेड तालुकाध्यक्षपदी नवनाथ बहिर यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शिक्षक समितीचे राज्यनेते मा.अनिलराव आंधळे यांच्या अध्यक्षतेखाली व मा.संजयजी धामणे (नाशिक विभागीय अध्यक्ष) मा.सिताराम सावंत (जिल्हाध्यक्ष) मा.विजय महामुनी (जिल्हा सरचिटणीस)आण्णासाहेब आंधळे (पाथर्डी तालुकाध्यक्ष) आदीच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष डमाळे यांनी केले.
या अधिवेशनामध्ये पुढील तीन वर्षासाठी जामखेड तालुका शिक्षक समिती कार्यकारिणीची निवड करण्यात
आली यामध्ये बहिर नवनाथ शिवाजी (अध्यक्ष)
मुरुमकर अरुण मधुकर (कार्याध्यक्ष)
जेधे विजय बापूराव (सरचिटणीस)
या वेळी सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक. श्री लक्ष्मीकांत इडलवार सर व मातावळी गावचे सरपंच नानासाहेब बांगर सर यांचा जामखेड तालुका शिक्षक समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
या वेळी ज्येष्ठ शिक्षक संजय घोडके, विक्रम बडे , अविनाश पवार यांनी मार्गदर्शन केले.
मा श्री प्रदीप झुंजरूक, बालाजी चव्हाण ,महेश मोरे, गणेश रोडे, नाना बांगर, लक्ष्मण वटाणे, अभिमान घोडेस्वार, बळी जायभाय, खंडू सोळंके, किरण पवार, मारुती फड, दादा डुचे, निलेश गरड, प्रशांत कुंभार, नामदेव खलसे, अमर चिंचकर, अतुल मुंजाळ, विवेक गर्जे, आदी शिक्षक व समिती प्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम ढवळे यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय घोडके सर यांनी मानले.