भारत पाक बॉर्डरचा राजा निघाला जम्मू काश्मीरला मोठ्या दिमाखात होणार विराजमान

0
118

जामखेड न्युज——

भारत पाक बॉर्डरचा राजा निघाला जम्मू काश्मीरला मोठ्या दिमाखात होणार विराजमान

 

भारत-पाक (एलओसी) सीमारेषेवर बसलेल्या पुंछ गावात भारतीय आर्मी युनिट 101 रेजिमेंट व राष्ट्रीय रायफल जवानांसोबत ईशर दिदी मानवाधिकार कार्यकर्ता, कार्याध्यक्षा प्रोग्रेसिव्ह नेशन्स एनजीओ व उपाध्यक्षा प्राचीन शिवदुर्गा भैरव मंदिर ट्रस्ट पुछं जम्मू-काश्मीर आणि त्यांचे सहकारी छत्रपती आवटे दादा अध्यक्ष प्रोग्रेसिव्ह नेशन्स एनजीओ किंग ऑफ एलओसी आयोजक मुंबई मुंबईच्या इंडियन नेव्ही बेस मेन गेट जवळ कुर्ला पश्चिम एलबीएस रोडवर, दुर्गा हॉटेल फिनिक्स मॉल जवळ श्री सिद्धिविनायक गणेश चित्र शाळा येथून मूर्तिकार विक्रांत पांढरे (दिव्यांग मूर्तिकार यांच्या चित्र शाळेतून रविवार दि.10 सप्टेंबर रोजी बाप्पाची सहा फुटाची मूर्ती गणेश उत्सव साजरा करण्यासाठी घेऊन जात आहे.


अखंडित हे चौदावे वर्ष आहे
पुलस्त ऋषीच्या नावाने प्रसिद्ध पुलस्त नदीच्या तटावर बसलेल्या पुछं जिल्हात उत्सव साजरा करण्याचे हे अखंडित १४ वे वर्ष आहे. यावर्षी एलओसी पुंछ वर तैनात गनर रेजिमेंट व आर.आर. च्या जवानांसोबत गणेश उत्सव साजरा करण्यास जात आहे.पुंछ सीमारेषा ही भारतातील पीरपंजाल या पर्वतश्रृंखलेतील भाग आहे. या पर्वतीय भागात जंगली जनावरांनी भरलेला घनदाट जंगलात बर्फाळ पाण्याच्या तीव्र प्रवाहाचा नद्या आहेत. आपले सैनिक या सर्व नैसर्गिक आपत्तींना तोंड देऊन देशाच्या शत्रूला रोखण्याचे कार्य बजावत आहेत. अशा परिस्थितीतही दरवर्षीप्रमाणे गणेश उत्सव साजरा करणार असा विश्वास सैनिकांना आहे आणि सैनिकांच्या या विश्वासाला तडा जाईल असे मी होऊ देणार नाही. या आत्मविश्वासाने ईशर दीदी गणेश मूर्तीस मुंबईहून घेऊन जात आहे. या कार्यात त्यांचे सहकारी छत्रपती आवटे दादा व प्रोग्रेसिव्ह नेशन्स एनजीओ चे सहकारी यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभते.

पूंछमध्ये दैनंदिन कार्यक्रम
कडाक्याच्या थंडीत पहाटे 5 वाजल्यापासून लहान मुलांच्या कार्यक्रमांसोबत सायंकाळी 7 वाजता सैनिकांच्या उपस्थितीत श्री ची आरती होते. गणेश भक्ताद्वारे प्रत्येक दिवशी वेगवेगळा प्रसाद वाटला जातो. अनंत चतुर्थीच्या दिवशी शेर ए कश्मीर पुलाजवळ पुलस्त नदीमध्ये बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन होते. गणपतीच्या शुभ आशीर्वादाने जम्मू-काश्मीरच्या विकासाची द्वारे उघडले आहेत. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ज्या प्रमाणे इंग्रजा विरुद्ध लढा देण्यास आपण सर्वजण एकत्र होतो. त्याचप्रमाणे पुढेही दहशतवादाविरुद्ध सर्वजण एकत्रित लढू

आताची वर्तमान परिस्थिती
नेहमी प्रमाणे आतंकवादी गतीविधी आणि आसपास बॉर्डरवर फायरिंग सुरू आहे. अशा परिस्थितीमुळे आम्ही प्रशासनाच्या आदेशानुसारच हा उत्सव साजरा करणार ज्यामध्ये भाईचारा राहील व शांततेत भंग पडणार नाही.

*ईशर दिदी यांनी दिलेली प्रतिक्रिया*
“हमारे परिवार ने देश के लिए शहादत दी है| जिसके कारण फौजी भाई और उनके परिवार की भावनाओ को हम अच्छे से समज सकते है| भाईचारा और फौजी भाईयों के हौसले बढाने के लिए ऐसे अनेक उपक्रम हम करते रहेंगे,और इस साल भी बप्पा हमें सही सलामत जम्मू कश्मीर ले जायेंगे”

जे जवान आपल्या स्वगृही जाऊ शकत नाही ते मोठ्या तन्मयतेने गणेशोत्सवात सामील होतात
सर्वात महत्त्वाची बाब अशी की आपले भारतीय सैनिक जे परिवारासोबत उत्सव साजरा करण्यास त्यांच्या स्वगृही जाऊ शकत नाही. ते बाप्पाच्या या मंडपाला आपले घर परिवार समजून पूर्ण भक्तीभावाने सहभागी होतात. संपूर्ण भारत वासियांना सुरक्षा देणारे व रोज तणावपूर्ण वातावरणात राहणारे आपले सैनिक उत्सवात सहभागी झाल्याने त्यांना अध्यात्मिक शांती प्राप्त होते. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सवाची सुरुवात केली.त्याच विचारांची व त्याच उद्देशाने प्रेरित होऊन ईशर दिदी (मानवाधिकार कार्यकर्ता ) यांनी या कार्यात स्वतःला समर्पित केले आहे. या कार्यात आजपर्यंत कोणत्याही व्यक्तीकडून आर्थिक मदत घेतलेली नाही. त्या स्वतहा संपूर्ण खर्च करतात मुंबई हुन ईशर दिदी चे सहकारी भाऊ छत्रपती दादा आवटे यांचा पूर्ण सहयोग असतो.

बाप्पांच्या आगमनाने पुंछ प्रगती पथावर आहे*आणि श्री चरणी आमची एक एवढीच विनंती आहे की, हळूहळू सर्व काही ठीक व्हावे श्री उत्सवामुळे बॉर्डरवर एकता सदभावनेमध्ये वाढ झाली. हे पाहून आपल्या सैनिकांच्या मनोबलात वाढ होण्यास मदत मिळाली आहे.

कसा होतो भारत पाक बॉर्डरचा राजाचा प्रवास*
स्वराज एक्स्प्रेसने बांद्रा टर्मिनस वरून सकाळी बाप्पाच्या निघणार 2000 अंतर कापून दुसऱ्या दिवशी सायंकाळी जम्मू रेल्वे स्टेशनवर पोहोचणार तिथे पुंछ जिल्ह्यातील बंधू भगिनी मोठ्या धुमधडाक्यात बाप्पांच्या स्वागतासाठी उपस्थित असतात. जम्मू रेल्वे स्टेशन येथून श्रीची मूर्ती ट्रक द्वारे ३०० किमी दुर बर्फाळ तसेच दुर्गम पर्वतीय रस्त्याने भारत पाक एलओसी पुंछ गावात घेऊन जातात

ईशर दीदींना इंडियन आर्मीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले*
सर्व प्रकारच्या अडचणीवर मात देऊन अतिसंवेदनशील एलओसी पुंछ बॉर्डरवर जवानांसाठी अखंडित गणेशोत्सवासाठी मूर्ती घेऊन जाणारी, जवानांचे मनोबल वाढावे म्हणून सतत उपक्रमांचे आयोजन करणारी ईशर दिदी मानवाधिकार कार्यकर्ता कार्याध्यक्षा प्रोग्रेसिव्ह नेशन्स एनजीओ उपाध्यक्षा प्राचीन शिवदुर्गा भैरव मंदिर ट्रस्ट पुंछ जम्मू-काश्मीर व प्रोग्रेसिव्ह नेशन्स एनजीओ गतवर्षी इंडियन आर्मी तर्फे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
या सन्मानाचा स्वीकार करताना

ईशर दिदी म्हणाल्या “हा सन्मान या कार्यात सहकार्य करणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीचा आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here