गणेशोत्सवासाठी मंडळांनी ऑनलाईन अर्ज करावेत – पोलीस निरीक्षक महेश पाटील

0
302

जामखेड न्युज——

गणेशोत्सवासाठी मंडळांनी ऑनलाईन अर्ज करावेत – पोलीस निरीक्षक महेश पाटील

 

आगामी गणेशोत्सव २०२३ करीता परवानगीसाठी पोलीस विभागाकडून गणेश मंडळांसाठी वेबसाईटवर सुविधा उपलब्ध केलेली आहे. तरी पोलीस विभागाकडून जाहीर केलेल्या वेबसाईटवर जाऊन गणेशोत्सव मंडळांनी सिटीझन पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. असे अवाहन जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे.

आवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेश उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. गणेश उत्सवात गणेश स्थापनेपासून विसर्जन मिरवणूक पर्यंत अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. यासाठी पोलीस प्रशासनाकडून परवानगी घेणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांना सोप्या पद्धतीने परवानगी घेता यावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने ऑनलाईन परवानगी देण्यासाठी सिटीझन पोर्टलवर वेबसाईट सुरू करण्यात आली आहे.

तरी आगामी काळात होणार्‍या गणेशोत्सवाच्या अनुषगांने गणपती स्थापना, मिरवणुक कार्यक्रमासाठी गणपती मंडळे व इतर नागरीक हे परवानगीसाठी सिटीझन पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याकरिता

(https://citizen.mahapolice.gov.in),

(www.mahapolice.maharashtra.gov.in)

वेबसाईटवर सुविधा उपलब्ध केलेली आहे. तरी या वेबसाईटवर जाऊन गणेश मंडळांनी अर्ज करावेत असे आवाहन जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here