जामखेड न्युज——
विद्यार्थ्यांनी पार पाडली शिक्षकांची भूमिका, सनराईज शैक्षणिक संकुलात शिक्षक दिन उत्साहात साजरा
जामखेड तालुक्यातील पाडळी फाटा येथील सनराईज शैक्षणिक संकुलातील स्व एम ई भोरे ज्युनिअर कॉलेज,साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय व सनराईज इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांची जयंती शिक्षकदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त शिक्षकांची जबाबदारी विद्यार्थ्यांनी पार पाडली. तसेच शाळेचे विविध कामकाजदेखील त्यांनी उत्कृष्टपणे सांभाळले.
डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला.या वेळी स्व एम ई भोरे ज्युनिअर कॉलेज,साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय व
सनराईज इंग्लिश स्कूल मध्ये डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला या कार्यक्रमात सर्व विदयार्थी व विद्यार्थिनी यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेऊन शिक्षक दिन साजरा केला.
यावेळी उपस्थित प्राचार्या श्रीमती जोगदंड मॅडम, तसेच तिन्ही विभागाचे शिक्षक वृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.