जामखेड न्युज——
ल. ना. होशिंग उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षकदिनी काळ्या फिती लावून प्राध्यापक प्राध्यापिका यांचे आंदोलन
शिक्षण विभागाने दिलेली आश्वासने पूर्ण करीत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाच्या वतीने दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी शिक्षक दिनानिमित्त काळ्या फिती लावून निषेध नोंदवला गेला.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघमार्फत गेल्या अनेक वर्षापासून काही मागण्या केल्या जात आहेत. जुनी पेन्शन योजना, आश्वासित प्रगती योजना , वाढीव पदांना रुजू दिनांक पासून मंजुरी, व आय टी विषय अनुदानित करणे, विनाअनुदानित वरून अनुदानित मध्ये बदली देण्यावरील स्थगती रद्द करावी, यासह जवळपास 13 मागण्या या संघटनेमार्फत सातत्याने केला जात असून यासाठी आंदोलने ही करण्यात आली आहेत शिक्षण मंत्री मा. दीपक केसरकर यांनी या मागण्या पूर्ण करण्याची आश्वासने दिली.
मात्र तेही पूर्ण करीत नसल्याने यावर्षी शिक्षक दिनी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध करणारे आंदोलन ल ना होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामखेड या ठिकाणी करण्यात आले याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक धुमाळ विनोदकुमार हरिभाऊ यांनी दिली या आंदोलनात सर्व प्राध्यापक प्राध्यापिका उपस्थित होते संपूर्ण जामखेड तालुका कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना 100% सामील होती यामध्ये प्राध्यापक वायकर कैलास नरसिंग (सेक्रेटरी), प्राध्यापक तांबोळी अब्दुल गणी (उपाध्यक्ष ),प्राध्यापक भोंडवे प्रदीप ( कार्याध्यक्ष) ,तसेच प्राध्यापक विधाते बापुराव नवनाथ (उपाध्यक्ष) हे सर्व उपस्थित होते.