अन्याय झाल्यास निर्भयपणे पुढे या – पोलीस निरीक्षक महेश पाटील जामखेड महाविद्यालयात युवती सक्षमीकरण: भान जबाबदारीचे या विषयावर एकदिवसीय परिसंवाद संपन्न

0
102

जामखेड न्युज——

अन्याय झाल्यास निर्भयपणे पुढे या – पोलीस निरीक्षक महेश पाटील

जामखेड महाविद्यालयात युवती सक्षमीकरण: भान जबाबदारीचे या विषयावर एकदिवसीय परिसंवाद संपन्न

अश्लिता फक्त कृतीत नसते तर व्यक्तीचे हावभाव, इशारे, मुद्दाम स्पर्श करणे, खूनवणे, विशिष्ट शब्दांचा वापर करणे इत्यादी मध्ये देखील असते कायदे अत्यंत कडक आहेत. तुम्ही अन्याय झाल्यास निर्भयपणे पुढे आले पाहिजे असे मत पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी मुलींना मार्गदर्शन करताना सांगितले.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, व दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे, जामखेड महाविद्यालय, जामखेड IQAC विभागाच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय परिसंवाद कार्यक्रम दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी सम्पन्न झाला, या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. उद्धव (बापू) देशमुख होते. व प्रमुख मार्गदर्शक मा.महेश पाटील साहेब (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, जामखेड) हे होते.या प्रसंगी जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डोंगरे एम. एल., संस्थेचे संचालक मा. सैफुल्ला खान साहेब, कला शाखा प्रमुख मा.प्रा.ए.बी.फलके,IQAC समन्वयक प्रा.गाडेकर एस.एन.वूमेन एम्पावरमेन्ट प्रमुख प्रा.डॉ.श्रीमती साबळे वाय.एस., प्रा.डॉ.देशपांडे आर.के व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना महेश पाटील म्हणाले की,
अन्याय झाल्यास निर्भयपणे पुढे आले पाहिजे पोलीस आपले कर्तव्य चोख पार पाडतील असे मत व्यक्त केले.तुम्हाला काही चुकीचे वाटत असल्यास थेट माझ्याशी संपर्क करा मी तात्काळ कारवाई करीन.यासाठी त्यांनी आपला संपर्क क्रमांक दिला. या परिसंवादात महाविद्यालयातील १८२विद्यार्थीनी उपस्थित होत्या.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत मा. प्राचार्य डॉ. डोंगरे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयातील विविध उपक्रमाबद्दल त्यांनी माहिती दिली. महाविद्यालय सातत्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवते त्याचाच एक भाग म्हणून मुलींच्या सक्षमी करणासाठी व त्यांना आत्म निर्भर बनण्यासाठी या परिसंवादाचे आयोजन केले असून याचा निश्चित फायदा महाविद्यालयातील मुलींना होईल असे मत मांडले.

यानंतर महाविद्यालयाच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री.उद्धव(बापू) देशमुख यांनी महाविद्यालयात होणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले तसेच असे परिसंवाद आपली माहिती प्रभावीपणे मांडण्याचे साधन असल्याचे म्हटले महाविद्यालयात होणाऱ्या उपक्रमांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि कार्यक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डोंगरे एम. एल. यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे कौतुक करून महाविद्यालयात होणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली, तसेच मुलींनी आपल्या मनात कोणतीही भीती न बाळगता आपणास काही अडचण आल्यास माझ्याकडे तक्रार करावी व आत्मनिर्भर होण्याचा सल्ला दिला. महाविद्यालय आपल्या पाठीशी असल्याचे मत त्यांनी मांडले.

 

 

संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. उद्धवबापू देशमुख, उपाध्यक्ष श्री. अरुणकाका चिंतामणी, सचिव मा. श्री. शशीकांत देशमुख, सहसचिव मा. श्री. दिलीपशेठ गुगळे, , संचालक मा.श्री. अशोकशेठ शिंगवी यांनी महाविद्यालयात होणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांचे कौतुक केलें.कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. डॉ . श्रीमती गायकवाड अश्विनी यांनी उपस्थितांचे आभार मानले.हा कार्यकाम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक, सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन व योगदान लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तरटे एन.बी.यांनी केले.

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here