शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे अँक्शन मोडवर कामचुकार व दांडीबहाद्दर शिक्षकांवर होणार कारवाई ?

0
198

जामखेड न्युज——

शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे अँक्शन मोडवर

कामचुकार व दांडीबहाद्दर शिक्षकांवर होणार कारवाई ?

 

गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी जामखेडचा पदभार स्वीकारल्या पासून तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी अचानक शाळा भेटी सुरू केल्या आहेत तसेच मिशन आपुलकी अंतर्गत शाळेच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी संकलन केले आहे. अचानक शाळा भेटीत काही शिक्षक गैरहजर दिसले त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामुळे कामचुकार व दांडीबहाद्दर शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.

अचानक शाळाभेटी तपासणीत जिल्हा परिषद प्राथामिक शाळा मोहा शाळेचे तीन शिक्षक विजय जाधव, रजनीकांत साखरे, प्रतिभा पवार हे गैरहजर होते यांची शेरेबुकाला नोंद घेऊन मुख्याध्यापकांनी या शिक्षकांना परस्पर हजर करून घेऊ नये असे शेरा बुकात म्हटले आहे. यामुळे गैरहजर शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.

जामखेड तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकारी वर्गाच्या संयुक्त पथकाने शुक्रवार दि. २५ / ८ / २३ रोजी सकाळी मोहा , साकत या शाळांना अचानक भेटी देऊन तेथील शिक्षक उपस्थितीची तपासणी केली असता मोहा जिल्हा परिषद शाळेतील तीन शिक्षक हे शिक्षक शालेय कामी गैरहजर असल्याचे दिसून आले.

याबाबत सविस्तर माहीती अशी की, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व मा. शिक्षणाधिकारी प्राथमिक अहमदनगर यांचे अचानक शाळा भेटीच्या आदेशानुसार तालूका गटशिक्षणाधिकारी श्री . बाळासाहेब धनवे , शिक्षण विस्तार अधिकारी श्री .चव्हाण , केंद्रप्रदुख श्री .पारखे यांच्या संयुक्त पथकाने मोहा व साकत जिल्हा परिषद शाळांना अचानक भेटी दिल्या त्यावेळी ही बाब उघडकीस आली.


बऱ्याच वेळा ज्या दिवशी दुपारी शिक्षणपरिषद असते त्या वेळी सकाळी किंवा शनिवार ची सकाळची शाळा असल्यास काही ठराविक शाळेतील शिक्षक शालेय कामी नेहमी गैरहजर राहत असल्याची ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. तसेच या शिक्षकांच्या शैक्षणिक वर्गाची गुणवत्ता एकदम ढासळलेली आहे अशा ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या शिक्षकांवर कारवाई होणे आवश्यक आहे असे पालक वर्गाचे मत आहे.

त्यामुळे येथून पुढेही अचानक शाळा भेटी होणार असल्याने कामचुकार शिक्षकांचे धाबे दणानले असून. गैरहजर शिक्षकावर गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here