जामखेड न्युज——
जामखेड महाविद्यालय विरुद्ध राज्य राखीव पोलीस यांच्यातील अटीतटीच्या कबड्डी सामन्यात जामखेड महाविद्यालयाचा संघ विजयी!!
कुसडगावच्या दौंड येथे कार्यरत असलेल्या SRPF बटालियनने पोलीस अधीक्षक दिलीप खेडकर यांच्या नेतृत्वाखाली एसआरपीएफ च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून एसआरपीएफ च्या कामासंदर्भात आणि शस्त्रांसंदर्भात माहिती देऊन प्रात्यक्षिक दिले व वृक्षारोपणही करत भालाफेक,गोळाफेक,100 मीटर रनिंग,खो खो,हॉलीबॉल,कबड्डी खेळ अशा अनेक स्पर्धांच आयोजन करण्यात आले होते. यात कबड्डीचा शेवटचा फायनल सामना जामखेड महाविद्यालय जामखेड व राज्य राखीव पोलीस यांच्यात झाला यात जामखेड महाविद्यालय विजयी झाले आहे.
सध्या दौड मध्ये कार्यरत असलेल्या कुसडगाव SRPF बटालियन ने कुसडगाव या SRPF सेंटर मध्ये गट क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये जामखेड महाविद्यालयाच्या कबड्डी संघाने सहभाग घेतला आणि क्रीडा स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सर्व सामने जिंकत फायनल मध्ये राज्य राखीव पोलीस संघाबरोबर अटीतटीच्या लढतीत जामखेड महाविद्यालय संघ विजयी झाला. या विजयी संघाचे SRPF बटालियन चे DYSP पाटील साहेब, जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, SRPF गटाचे PSI जाधव , PSI निकम साहेब, PSI बुरागे साहेब यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष उद्धव देशमुख, उपध्यक्ष अरुण चिंतामणी, संस्थेचे सचिव शशिकांतजी देशमुख, खजिनदार राजेशजी मोरे, संचालक अशोक शिंगवी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एल. डोंगरे, उप-प्राचार्य डॉ. सुनिल नरके व सर्व संचालक मंडळ आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विजयी संघातील खेळाडूंचे अभिनंदन केले.