जामखेड न्युज——-
बाजार समितीचे संचालक वैजीनाथ पाटील मारहाण प्रकरणी खर्डा कडकडीत बंद!!!
साक्ष देण्याच्या कारणावरून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजनाथ पाटील यांना काल न्यायालयाच्या आवारातच दोघांनी मारहाण केली होती. या घटनेच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने पुकारण्यात आलेल्या खर्डा बंदला नागरिक व व्यापाऱ्यांनी शंभर टक्के उत्फुर्त प्रतिसाद देऊन बाजारपेठ बंद ठेवत कडकडीत बंद ठेवला.
खर्डा येथील खर्डा ग्रामपंचायतचे सरपंच पती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांना दोघांकडून न्यायालयाच्या आवारातच लोखंडी टामीने मारहाण करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ म्हणून दिनांक २४ ऑगस्ट रोजी बाजार समिती संचालक वैजीनाथ पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी भाजपाकडून निषेध व्यक्त केला होता.
दि. २५ ऑगस्ट रोजी खर्डा शहर बंद करण्याचे निवेदन निवासी नायब तहसीलदार जामखेड यांना देण्यात आले होते. व अशा घटना पुन्हा घडवून नयेत याकरिता आज खर्डा बंदला आज सकाळपासून उत्सुर्फ प्रतिसाद मिळाला आहे. खर्डा गावातील छोटे मोठे व्यावसायिक, कापड दुकान, किराणा व्यापारी, हॉटेल व्यावसायिक सह इतर सर्व लहान मोठी दुकाने व्यापाऱ्यांनी बंद ठेवली होती.
शहरातील सर्व नागरिक, व्यापारी व मित्र मंडळींनी शहर बंद ठेऊन सहकार्य केल्याबद्दल संचालक वैजीनाथ पाटील यांनी खर्डा वासियांचे आभार मानले. खर्डा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांनी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता.