जामखेड न्युज——
कै. देवराव दिंगाबर वराट काँलेज आँफ फार्मसी साकत ता. जामखेड जि.अहमदनगर ला मान्यता – अध्यक्ष प्रा. अरूण वराट
परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया नवी दिल्ली तर्फे कै. देवराव दिंगाबर वराट काँलेज आँफ फार्मसी साकत ता. जामखेड जि. अहमदनगर ला मान्यता मिळाली आहे. दि. २५ आँगस्ट २०२३ पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. अशी माहिती संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरूण वराट यांनी दिली आहे. यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून श्री साकेश्वर सायन्स ज्युनियर कॉलेज साकत व जय हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोल्हेवाडी यानंतर आता फार्मसी च्या रूपाने नवीन कोर्सला मान्यता मिळाल्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
साकत सारख्या दुर्गम भागात प्रा. अरूण वराट व कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेडचे उपसभापती कैलास वराट या बंधुंनी अकरा वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून साकेश्वर सायन्स ज्युनियर कॉलेज व जय हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुरू केले आज मोठा वटवृक्ष निर्माण झाला आहे.यातच आता फार्मसी काॅलेजचे भर पडली आहे. हजारो विद्यार्थ्यांना या शिक्षण संस्थेमुळे फायदा झाला आहे.
महाराष्ट्रातील अनेक मेडिकल व इंजिनिअरिंग काॅलेज मध्ये या संस्थेचे विद्यार्थी आहेत. संस्थेने आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी हि संस्था आकर्षण ठरली आहे. आता फार्मसी च्या रूपाने नवीन कोर्स सुरू झाल्याने ग्रामीण भागात व्यावसायिक शिक्षणाचे द्वार उघडले आहे. वराट बंधू मुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचा मोठा फायदा होणार आहे.









