राज्यस्तरीय सॅम्बो स्पर्धेमध्ये श्रेयस वराट ला सुवर्ण पदक
सॅम्बो असोशियशन ऑफ महाराष्ट्र च्या मान्यतेने औरंगाबाद जिल्हा सॅम्बो असोशियशन आयोजित विभागीय क्रीडा संकुल, छत्रपती संभाजीनगर येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय सॅम्बो अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी सब-ज्युनिअर गटामध्ये आयडियल स्पोर्टस् अकॅडमी, जामखेड चा खेळाडू श्रेयस सुदाम वराट याने सुवर्णपदक मिळविले आहे.
त्याला प्रशिक्षक प्रा.लक्ष्मण उदमले, शाम पंडित यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्याच्यावर संपूर्ण जामखेड तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मागील महिन्यात पार पडलेल्या ऑल महाराष्ट्र वुशु असोसिएशनच्या वतीने अमरावती येथील राज्यस्तरीय ज्युनिअर व सब ज्युनिअर वुशु अजिंक्यपद स्पर्धेत श्रेयस वराटने रौप्य पदक मिळवले होते. यावेळी सुवर्ण पदक मिळवले आहे.
सॅम्बो असोशियशन ऑफ महाराष्ट्र च्या मान्यतेने औरंगाबाद जिल्हा सॅम्बो असोशियशन आयोजित विभागीय क्रीडा संकुल, छत्रपती संभाजीनगर येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय सॅम्बो अजिंक्यपद स्पर्धेमध्ये श्रेयस वराटने सुवर्ण पदक मिळवले आहे. यामुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे.