जामखेड न्युज——
डॉ. रंगनाथ सुपेकर यांचा झाडू ते खडू प्रवास जिद्द व चिकाटी मुळेच – न्यायाधीश सुदाम तांबे
डॉ. सुपेकर यांचा सेवापुर्ती गौरव तसेच तीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न
डॉ. रंगनाथ सुपेकर यांनी नोकरीची सुरूवात कोर्टात शिपाई म्हणून केली जिद्द चिकाटी व मेहनतीमुळेच ते प्राध्यापक झाले. आणी तीन पुस्तके लिहिली आहेत. त्यांचा झाडू ते खडू प्रवास रोमहर्षक आहे. तरूण पिढीने त्यांचा आदर्श घ्यावा असे त्यांचे काम आहे. आता उर्वरित आयुष्य त्यांनी समाजाला न्याय देण्यासाठी लेखन करावे असे आवाहन न्यायाधीश सुदाम तांबे यांनी डॉ. सुपेकर यांच्या सेवापुर्ती गौरव सोहळ्यात केले.

जामखेड महाविद्यालय जामखेड येथील डॉ. प्रा. रंगनाथ सुपेकर यांचा सेवापुर्ती सोहळा व तीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव शशिकांत देशमुख, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा व सत्र न्यायाधीश सुदाम तांबे, राजेंद्र सुर्यवंशी, चंद्रकांत जोशी प्रकाशक, पुणे आयुक्त शिरीष जाधव, लालासाहेब शेटे, डिवायएसपी, चांगदेव कांबळे प्राचार्य पंढरपूर महाविद्यालय पंढरपूर, अशोक धुलधुले, प्राचार्य अब्दुल कलाम महाविद्यालय बीड, डॉ. माहेश्वरी गावित प्राचार्य सारडा महाविद्यालय नगर, वंचित बहुजन आघाडीचे नेते व निवारा बालगृहाचे प्रमुख अँड डॉ. अरूण जाधव, प्राचार्य एम एल डोंगरे, प्रा. कांबळे, माजी प्राचार्य अनंता खेत्रे, डॉ. संतोष साळुंखे इंग्रजी विभाग प्रमुख भोर यांच्या सह अनेक मित्रपरिवार तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सेवापुर्ती गौरव सोहळ्यात लावणी रंग रूप, लावणी परंपरा ते आधुनिकता, झाडू ते खडू एक जीवनप्रवास या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला

यावेळी बोलताना पंढरपूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चांगदेव कांबळे म्हणाले की, प्रा. सुपेकर यांनी जीवनात खुप संघर्ष केला आहे. पण परिस्थितीशी कधीही रडले नाहीत तर ते लढले आणि इथपर्यंत प्रवास केला आहे. आता उर्वरित आयुष्यात वाचन, चिंतन व मनन करून समाजाच्या वेदना मांडाव्यात. असे आवाहन केले.
यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना संस्थेचे सचिव शशिकांत देशमुख म्हणाले की, प्रा. रंगनाथ सुपेकर यांची जामखेड महाविद्यालयातील कष्टाळू, जिद्द असणारे प्राध्यापक म्हणून ओळख होती. आता ते सेवानिवृत्त होत आहेत त्यांनी समाजासाठी लिखाण करावे व सामाजिक काम करावे.

सत्काराला उत्तर देताना प्रा. रंगनाथ सुपेकर म्हणाले की, जामखेड महाविद्यालयाने व दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीने मला भरभरून प्रेम दिले. यामुळेच बायपास होऊनही बारा वर्षे यशस्वी सेवा केली महाविद्यालयात एकुण ३२ वर्षे सेवा केली. या काळात स्वच्छंदी जीवन जगलो.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणी निवेदिका जोशी मँडम यांनी तर आभार प्रा. सुनील मोहळकर यांनी मानले.










