जामखेड न्युज——
जामखेड महाविद्यालयाचे प्रा.डॉ.केळकर यांच्या पेटंटला मान्यता
जामखेड महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा
जामखेड महाविद्यालयाचे जामखेड येथील भूगोल विषयाचे अभ्यास डॉ. गौतम केळकर हे नेहमीच अनेक नवनवीन उपक्रम व विषयांतर्गत संशोधन करत असतात.त्यांनी सद्यस्थितीला अनुसरून नाविन्यपूर्ण असा सोलर ट्री फॉर एनर्जी जनरेशन मध्ये पेटंट मिळवले आहे.
या पेटंटचा उपयोग आज संपूर्ण जनसामान्य जनतेला व जगाला भेडसावणारी विजेची समस्या दूर होण्यास मदत करणारा आहे. डॉ.गौतम केळकर यांनी कल्पकतेने त्याची रचना व मांडणी करून वीज निर्मिती करण्यासाठी त्यांचे हे पेटंट महत्त्वपूर्ण योगदान देणार आहे. त्यांच्या या कार्यामुळे महाविद्यालयात उत्साह व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच डॉ. गौतम केळकर हे 17 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी अहमदनगर जामखेड महाविद्यालयाचे एन.सी.सी विभागाचे प्रमुख असून ते सद्यस्थितीला कॅप्टन या रँक वर कार्यरत आहेत. त्यांनी एन.सी.सी विभागामार्फत अनेक तरुणांना मार्गदर्शन करून आर्मी, नेव्ही, बी. एस.एफ, रेल्वे पोलीस, महाराष्ट्र पोलीस, इत्यादी क्षेत्रातील अनेक तरुणांना भरती होण्यास प्रशिक्षण देऊन देश सेवेसाठी मोलाचे योगदान दिले आहे.
नुकत्याच त्यांना सोलर ट्री फॉर एनर्जी जनरेशन या पेटंट प्राप्त झाल्याबद्दल
पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे, अध्यक्ष मा. श्री उद्धवराव देशमुख , उपाध्यक्ष मा.श्री अरुणशेठ चिंतामणी , सचिव मा.श्री शशिकांतजी देशमुख , सहसचिव मा.श्री दिलीपशेठजी गुगळे, खजिनदार मा.श्री राजेशजी मोरे,संचालक मा. श्री सैफुल्ला खान, मा. श्री अशोकशेठ शिंगवी , व सर्व संचालक मंडळांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.एम.एल डोंगरे , उपप्राचार्य व भूगोल विभाग प्रमुख प्रा.डॉ.एस.वाय नरके, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्वच सामाजिक स्तरातून प्रा.डॉ.गौतम केळकर यांचे अभिनंदन होत आहे.