जामखेड न्युज——
कर्जत जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीला विरोध करणाऱ्या सरकार विरोधात विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन
आमदार रोहित पवार यांनी कर्जत जामखेड तालुक्यातील बेरोजगार युवकांसाठी पाटेगाव खंडाळा येथे सुमारे १३०० एकर जागा उपलब्ध करत प्रस्ताव सादर केला होता. सर्व कार्यवाही पूर्ण केली पण सरकार बदलले आणी एमआयडीसीला विरोध सुरू झाला. आमदार रोहित पवार यांनी शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा सुरू केला तरी मान्यता मिळत नाही म्हटल्यावर विधानभवना समोर दिनांक २४ जुलै २०२३ रोजी उपोषणाला देखील बसले होते. आज मतदारसंघात विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. मान्यता न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त कडेकोट ठेवण्यात आला होता.
विधानभवनाबाहेरील उपोषण मागे घेतल्यावर
उद्योगमंत्री यांनी बैठकीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सदर बैठकीसाठी मा. रोहित दादा व संबंधित अधिकारी वेळेवर उपस्थित होते. व तब्बल चार तास वाट पाहत बसले होते. मात्र उद्योगमंत्री बैठकीस आलेच नाही.कर्जत जामखेड मधील तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध होण्यासाठी आणि या भागाचा कायापालट होण्यासाठी MIDC मंजूर होणे अतिशय आवश्यक आहे. म्हणून मतदारसंघातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या हजारोंच्या संख्येने मुले मुंबई, पुणे, चाकण येथे रोजदारीने काम करीत आहे. त्यामुळे आमच्या हक्काची एमआयडीसी आमच्या मतदारसंघात हवी आहे. ही लढाई श्रेयवादाची नसुन ही लढाई कर्जत जामखेड मतदारसंघातील बेरोजगार युवकांच्या भविष्याची आहे. आणि त्यांच्या भविष्यासाठी आम्ही आ. रोहित दादा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील पाटेगाव-खंडाळा येथील सर्व प्रक्रिया पूर्ण झालेल्या आणि केवळ सरकारच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या एमआयडीसी बाबतचा मुद्दा सध्या चांगलाच पेटला आहे. आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी उद्योग मंत्र्यांच्या भेटी घेऊन हा विषय मार्गी लावण्याबाबत विनंती केली व अंतिम मंजुरी मिळावी यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला. विधिमंडळ अधिवेशनात वेळोवेळी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतरही सरकारकडून केवळ मंजुरीच्या आश्वासन मिळत असल्याने व कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्याने अखेर आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळ परिसरात भर पावसात आंदोलन केले होते. तेव्हा सरकारने बैठक घेऊन उद्या निर्णय घेऊ म्हणाले होते. पण दुसऱ्या दिवशी कसलीही बैठक घेतली नाही म्हणून मतदारसंघातील बेरोजगार युवकांच्या वतीने आज कर्जत जामखेड तालुक्यात अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रा. मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे, राजेंद्र कोठारी,मोहन पवार , पिंटू बोरा, संदीप गायकवाड, रमेश आजबे, विजयसिंह गोलेकर, सरपंच समीर पठाण, काकासाहेब वाळूंजकर, पवन राळेभात, नरेंद्र जाधव, वैजीनाथ पोले, उमर कुरेशी, शरद शिंदे, सुधीर राळेभात, काकासाहेब कोल्हे, अमर चाऊस, सूर्यकांत मोरे, रमेश आजबे, शहाजी राळेभात, मंगेश आजबे, निखिल घायतडक, प्रकाश काळे, प्रकाश सदाफुलें, कैलास वराट, हनुमंत पाटील, पवन राळेभात, युवराज उगले, सागर कोल्हे, विद्या वाव्हळ,अनुराधा अडाले, वैशाली शिंदे, अनुष्का वारे, प्रिती सदाफुले, संगीता तोरडमल, स्मिता गुलाटी, तरनुम शेख , शुभांगी नन्नवरे, रंजना पवार आदी महिला उपस्थित होते.