शालेय विद्यार्थ्यांसाठी राजुरी बस वेळेवर सोडावी – सरपंच सागर कोल्हे

0
143

जामखेड न्युज——

शालेय विद्यार्थ्यांसाठी राजुरी बस वेळेवर सोडावी – सरपंच सागर कोल्हे

 

राजुरी येथिल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जामखेडला उच्च शिक्षण घेण्यासाठी वेळेवर एस टी बस येत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे सकाळी येत आसलेल्या बसच्या वेळेत बदल करावा त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही आशी मागणी राजुरी गावचे सरपंच सागर कोल्हे व त्यांच्या सहकार्‍यांनी जामखेड अगार व्यवस्थापक यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

शहरात शिक्षणासाठी जामखेड तालुक्यातील खेड्या पाड्यातून येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गोरगरीब पालकांचे मुलेमुली परिवहनच्या बसने प्रवास करत असतात. मात्र राजुरी येथिल कॉलेज च्या विद्यार्थ्यांना जामखेड येथे सकाळ च्या वेळी उच्च शिक्षण घेण्यासाठी बस वेळेवर येत नाही.

सकाळी सव्वासात वाजता राजुरी या ठीकाणी बस येते मात्र कॉलेजची वेळ देखील सव्वासात आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना एक तास कॉलेज ला येण्यास वेळ लागत आसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे सकाळी राजुरी येथे साडेसात वाजता येणाऱ्या एस टी बस ची वेळ बदलुन ती साडेसहा वाजता राजुरी मध्ये आली पाहिजे आशी व्यवस्था करण्याच्या मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा सरपंच सागर (भाऊ) कोल्हे, उपसरपंच डॉ नानासाहेब खाडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब कोल्हे यांनी अगार व्यवस्थापक यांच्याकडे केली आहे.

निवेदन प्राप्त होताच राजुरी या ठीकाणी विद्यार्थ्यांना शाळा व कॉलेजसाठी जामखेडला जाण्यास वेळेवर बस देण्यात येईल असे अश्वासन आगार प्रमुखांनी राजुरी चे सरपंच सागर कोल्हे यांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here