डॉ सुरज काशीद एमडी मेडिसीन परिक्षा उत्तीर्ण. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्यातर्फे सत्कार.

0
115

जामखेड न्युज——

डॉ सुरज काशीद एमडी मेडिसीन परिक्षा उत्तीर्ण.

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्यातर्फे सत्कार.

 

जामखेड येथील डाॅ. सुरज‌ काशीद हे एमडी मेडिसीन परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.या यशाबद्दल सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी डाॅ.सुरज काशीद यांचा सत्कार केला.

डाॅ.सुरज काशीद हे जामखेड येथील सूप्रसिद्ध डॉ.सुरेश काशीद आणि डॉ.विद्या सुरेश काशीद यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. डॉ.सूरज यांनी एमबीबीएस ची पदवी पुणे येथून घेतली. तर धुळे येथून त्यांनी एमडी मेडीसिन ची पदवी संपादन केली.

डाॅ.सुरज काशीद यांच्या या यशाने तालुक्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला असल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी प्रतिष्ठान मार्फत त्यांचा सन्मान केला.

यावेळी डॉ सुरेश काशीद ,उद्योजक किशोर अंदुरे, नितीन तवटे, सचिन गाडे, तेजस कोठारी, सार्थक कोठारी, धनंजय भोसले, मयुर भोसले, जामखेडचे माजी सरपंच सुनील कोठारी , विजय कोठारी , तेजस कोठारी , जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी , पारस कोठारी, मनोज बन , अनिल फिरोदिया, आनंद गुगळे, संजय कटारिया,संजय कोल्हे , सुमित चानोंदिया, नितीनशेठ पारख , महेंद्र प्रकाश बोरा उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here