स्वतः चा जीव धोक्यात घालत फायर करणाऱ्या आरोपींना पकडणाऱ्या जामखेड पोलीसांच्या साहसाचे सर्वत्र कौतुक

0
216

जामखेड न्युज——

स्वतः चा जीव धोक्यात घालत फायर करणाऱ्या आरोपींना पकडणाऱ्या जामखेड पोलीसांच्या साहसाचे सर्वत्र कौतुक

जामखेड शहरात मध्यरात्री भयानक थरार घटना घडली शहरातील तपनेश्वर येथील कारचालकाच्या डोक्याला पिस्टल लावून कार पळवली असल्याची
माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी आरोपीच्या शोघात टिम तयार करत जीपीएस सिस्टीम नुसार खर्डा रस्त्यावर एका हॉटेल समोर तीन आरोपी बसलेले दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना झटापट झाली. आरोपीने पिस्टल बाहेर काढत पोलिसांवर रोखले पिस्टलचे ट्रिगर दाबुन पोलिसांवर गोळी फायर करण्याचा प्रयत्न केला.परंतु त्याचे पिस्टलमधील गोळी फायर झाली नाही. तेव्हा जीवाची पर्वा न करता पोलीसांनी आरोपीला मिठ्ठी मारली याचवेळी प्रसंगावधान दाखवत पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी स्वत:च्या आरोपीच्या पायावर गोळीबार करून तीनही आरोपी ताब्यात घेतले. या घटनेमुळे स्वत:चा जीव धोक्यात घालत आरोपींना पकडणाऱ्या जामखेड पोलीसांचे कौतुक होत आहे. यामध्ये दोन पोलीस किरकोळ जखमी झाले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जामखेड पोलीस ठाणे हद्दीत पो नि पाटील व पथक गस्त करीत असताना आज दिनांक 19.07.2023 रोजी 00.30 वाजता चे समोर अर्बन बँक समोर , तपणेश्वर रोड, जामखेड या ठिकाणी इसम नामे अदनान शेख व प्रज्वल पालवे यांनी पोलीस वाहनास हात दाखवून माहिती दिली की, आरोपी नामे प्रताप पवार याने अदनान याचे डोक्याला पिस्टल लाउन जीवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच त्याचे 2 अनोळखी साथीदारांनीही जीवे ठार मारण्याची धमकी दिली व फिर्यादी यांचे ताब्यातील मोटार कार क्रमांक MH 12 KT 4795 जबरीने घेऊन गेले आहेत. तसेच वाहनास जी पी एस सिस्टिम असल्याने वाहन सारोळा रोड परिसरात आहे.


सदर ची माहिती मिळताच पोलिसांनी अधिक कुमक मदत मागावीत नमूद आरोपी व गेल्या वाहनाचा शोध घेतला असता वाहन हे क्रिकेट मैदान, सारोळा रोड या ठिकाणी मिळून आले परंतु आरोपी इसम मिळून आले नाहीत.

आरोपी इसमाचा खर्डा रोड, जामखेड परिसरात शोध घेतला असता अंदाजे 00.45 वाजता चे सुमारास सदर 3 आरोपी हे साई हॉटेल, खर्डा रोड या ठिकाणी मिळून आले. आरोपीने पोलिसांचे स्वाधीन होण्याचे आवाहन केले असता 2 अनोळखी आरोपीतांनी पोलिसांवर जीवघेणा हल्ला करीत झटापट केली तसेच त्याचवेळी आरोपी नामे प्रताप उर्फ बाळा पवार याने त्याच्याकडील पिस्टल पोलिसांचे दिशेने रोखून गोळी फायर करण्याचा प्रयत्न केला.

सदरवेळी पोलिस पथक व फिर्यादी यांचे जीवितास तात्काळ मृत्यू येण्याइतपत धोका निर्माण झाल्याने पो नि पाटील यांनी शासकीय सर्विस रिव्हाल्वर मधून आरोपी प्रताप उर्फ बाळा पवार यांचे पायाचे दिशेने 1 गोळी फायर केली. आरोपी जखमी झाला त्याचवेळी पोलिसांनी सर्व आरोपीतांवर झडप घालून कमीत कमी बळाचा वापर करून आरोपीला ताब्यात घेतले .

आरोपींवर ग्रामीण रुग्णालय जामखेड या ठिकाणी प्राथमिक उपचार केलेले आहेत. मा वैद्यकीय अधिकारी यांनी आरोपी नामे प्रताप उर्फ बाळा पवार यास सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर या घेऊन जाण्याचा सल्ला दिल्याने पो उ नि भारती व पथक यांचे समवेत त्यास सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहे.

तसेच त्याचे 2 अनोळखी साथीदार शुभम बाळासाहेब पवार व काकासाहेब उत्तम डुचे अशी आहेत. त्यांनाही ताब्यात घेतले आहे . खालील प्रमाणे आरोपी वर 2 गुन्हे दाखल झाले आहेत.
1)जामखेड पोलीस स्टेशन गु.र.न.324/2023 भा द वी कलम 392 ,504,506,34 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे फिर्यादी अदनान जहुर शेख रा.तपनेश्वर रोड, जामखेड व
2)जामखेड पोलीस स्टेशन गु र न 325/2023 भा द वी कलम 307, 353,332, भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 28 प्रमाणे पोलीस नाईक संतोष कोपनर यांनी फिर्याद दिली आहे.

सदर पथकात पोलीस निरीक्षक महेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, पोलीस नाईक अविनाश ढेरे, संतोष कोपनर, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे, गणेश भागडे, देविदास पळसे, कुलदीप घोळवे, चालक हवालदार भगवान पालवे असे पथकात सामील होते.

जखमी आरोपी प्रताप उर्फ बाळा पवार हा अभिलेखवरील आरोपी असून त्याच्यावर जबरी चोरी, दरोडा व अग्निशस्र हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे नोंद आहेत

1)प्रताप ऊर्फ बाळु हनुमंत पवार वय-30 वर्षे विरुद्ध नोंद गुन्हे
1) जामखेड पो.स्टे 30/2019 भादवि क 394,427
2) दत्तवाडी पो.स्टे पुणे 3063/2017 मुं.पो.ॲक्ट क 37(1),(3),135
3) किनगाव पो.स्टे लातुर 51/2016 भादवि क 395
4) रेनापुर पो.स्टे लातुर 114/2016 भादवि क 395, आर्म ॲक्ट क 3/25.
5) किनगाव पो.स्टे लातुर 51/2015 आर्म ॲक्ट क 3/25
सदरची कामगिरी राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर, प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर, विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग यांचे मार्गदर्शन खाली पोलीस निरीक्षक महेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, पोलीस नाईक अविनाश ढेरे, संतोष कोपणर, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे, गणेश भागडे, देविदास पळसे, कुलदीप घोळवे, चालक हवालदार भगवान पालवे ,मोबाईल सेल अहमदनगर नेमणुकीचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिंदे, राहुल गुंडू यांनी सदरची कामगिरी केली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडे,व पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती करीत आहेत.

या घटनेमुळे जामखेड परिसरातील गुन्हेगारांवर पोलीसांचा वचक निर्माण झाला आहे तसेच जामखेड पोलीसांच्या साहसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here