जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लटकेवस्तीचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश, सात विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत

0
152

जामखेड न्युज——

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लटकेवस्तीचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश, सात विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत

12 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लटकेवस्तीच्या सात विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता स्थान मिळवले 1)शंभूराजे केशवराज कोल्हे 2)साईश नवनाथ बहिर 3)लक्ष्मी संभाजी लटके 4)राजवीर रविंद्र भापकर 5)श्रेया बबन गव्हाणे 6)गौरव सुभाष लवांडे 7)तनया बाळकृष्ण निकम
या सात विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे.

या विद्यार्थ्यांना श्रीमती रसिका महालिंग गाढवे व श्रीमती अनिता विठ्ठल पवार यांचे मार्गदर्शन लाभले.


यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री नवनाथ लटके,श्री रामचंद्र लटके,श्री राजेंद्र लटके,श्री भागवत निकम,श्री दादा लटके,श्री अशोक लटके,श्री विष्णु लटके,श्री अशोक पवार,श्री भाऊसाहेब लटके,ग्रामपंचायत सदस्य सौ राजश्री लटके,सरपंच सौ गिरिजा उतेकर,केंद्रप्रमुख श्री वांडरे सर,शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती कामिनी राजगुरू मॅडम, गट शिक्षणाधिकारी श्री धनवे साहेब,गट विकास अधिकारी श्री पोळ साहेब व नायगाव केंद्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी अभिनंदन केले.

चौकट
लटकेवस्ती शाळेने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. आतापर्यंत नऊ विद्यार्थी नवोदय साठी लागलेले आहेत तसेच अनेक विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आलेले आहेत तसेच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यामुळे जामखेडच्या अनेक पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश लटकेवस्ती शाळेत घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here