तालुक्यातील हळगाव येथे आढळले तीन मृतदेह परिसरात एकच खळबळ

0
216

जामखेड न्युज——

तालुक्यातील हळगाव येथे आढळले तीन मृतदेह
परिसरात एकच खळबळ

तालुक्यातील हळगाव येथे शेत तळ्यामध्ये दोन स्री जातीचे व एक पुरुष जातीचे असे एकूण तीन मृतदेह पाण्यामध्ये आढळून आले मृतदेह बाहेर काढून वैद्यकीय अधिकारी यांना बोलावून जाग्यावरच शवविच्छेदन केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटना घातपात आहे की आत्महत्या याचा तपास पोलीस करत आहेत.

दिनांक 12.7.2023 रोजी दुपारी 16.00 वा सुमारास श्री सुरेश यशवंत ढवळे हळगाव पोलीस पाटील यांनी फोन वरून खबर दिली की श्री भीमराव माहदू पिंपळे राहणार हळगाव यांच्या शेत गट नंबर 434 मधील शेत तळ्यामध्ये दोन स्री जातीचे व एक पुरुष जातीचे असे एकूण तीन मृतदेह पाण्यामध्ये तरंगत आहेत. पोलिस पाटील यांनी कळविले की सदरचे प्रेत हे हळगाव गावातील असून ते 1) चांदणी उर्फ उमा बबन पाचरणे वय 31 वर्ष .2) दिपाली बबन पाचारणे वय 11 वर्ष 3) राजवीर बबन पाचारने वय 8 वर्ष सर्व राहणार हळगाव यांचे आहेत.

खबरीवरून जामखेड पोस्टे आ. मू .रजी 41/2023 crpc174 प्रमाणे दाखल केली असून घटनास्थळी पो नि महेश पाटील , सपोनी सुनील बडे व पोलीस स्टाफ पोहोचले. प्रेतांना शेततळ्यातून गावकऱ्यांच्या मदतीने शेत तलावाच्या बाहेर काढून जागीच दोन वैद्यकीय अधिकारी यांना बोलून त्यांच्या करवी पोस्टमार्टम करण्यात आले आहे.

दि. 10.07.23 रोजी सायंकाळी पासून सदर महिला व मुले ही हरवली होती. त्याबाबत दिनांक 11.7.23 रोजी पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली होती. दिनांक 12.07.23 ला मृतदेह मिळाले आहेत.

पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बडे हे करीत आहेत

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here