जामखेड न्युज——
यशस्वीतेसाठी परिश्रमाला पर्याय नाही -प्रा.श्रीराम मुरूमकर
सुदाम वराट यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्यांचे वाटप
विध्यार्थी दशेतच ज्यांचा स्वत:च्या ध्येयावर दृढ विश्वास असतो. तिच माणसं जीवनात यशस्वी होतात. मन, मनगट आणि मेंदू यांच्या सामर्थ्यातून तुम्ही तुमचे ध्येय सहज साध्य करू शकता कठोर परिश्रम घेतले तर यश हमखास मिळते असे मत माजी प्राचार्य मुरुमकर यांनी सांगितले.
श्री साकेश्वर विद्यालयातील सहशिक्षण तसेच जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयातील गरजू विद्यार्थी तसेच माता पालक नसलेल्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य श्रीराम मुरूमकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जामखेड चे पोलीस निरीक्षक महेश पाटील हे होते. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, डॉ. भगवान मुरूमकर, माजी चेअरमन प्रा. अरूण वराट, ज्ञानदेव मुरूमकर, केंद्रप्रमुख किसनराव वराट, महादेव वराट, नानासाहेब लहाने, पोलीस हेडकाँन्टेबल पालवे, पोलीस पाटील महादेव वराट, जामखेड मिडिया क्लबचे उपाध्यक्ष अशोक वीर, सहसचिव पप्पू सय्यद, पत्रकार अविनाश बोधले, किरण रेडे, मुख्याध्यापक दत्ता काळे, राजकुमार थोरवे, महादेव मत्रे, अर्जुन रासकर, अशोक घोलप, सचिन वराट, सुलभा लवुळ, विजय हराळे, अतुल दळवी, आश्रू सरोदे, राम जावळे, भाऊसाहेब लहाने यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे. यामुळे कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. तुमचे मन, मेंदू आणि मनगट मजबूत हवे सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा या मृगजळासारख्या आहेत; पण त्यातील यश सत्यात उतरविणे ही बाब अशक्यप्राय नाही. कठोर परिश्रम, नियोजनबद्ध अभ्यास याला कोणताही पर्याय नाही ही बाब समजून प्रयत्न केल्यास स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होणे शक्य आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी अनावश्यक खर्चाला फाटा देऊन शालेय विद्यार्थ्यांसाठी सहा मुलांना शालेय गणवेश तर बारा मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच शाळेतील सर्व मुलांना जेवन देण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक दत्ता काळे यांनी प्रस्तावित केले तर डॉ. भगवानराव मुरूमकर, संजय वराट, ज्ञानदेव मुरूमकर यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन रासकर यांनी तर आभार अशोक घोलप यांनी मानले.