जामखेड पोलीस अँक्शन मोडमध्ये नियमबाह्य गाड्यांवर कारवाई सुरू

जामखेड न्युज——

जामखेड पोलीस अँक्शन मोडमध्ये नियमबाह्य गाड्यांवर कारवाई सुरू

जामखेड शहर व पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विना नोंदणी व विना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई करण्यात येत असून अशी वाहने आढळल्यास पुढील कारवाईसाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे जमा करण्यात येतील अशी माहिती जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली आहे.

गेली चार ते पाच दिवसांपासून बेशिस्त ट्रॅफिक, विना नोंदणी व नंबर नसलेल्या वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम जामखेड शहरात राबविण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर दि. ७ जुलै रोजी जामखेड शहरातील जयहिंद चौक येथे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली.

यावेळी जामखेड न्युजशी बोलताना पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले की, कोणतेही वाहन विना नोंदणी चालविणे कायद्याने गुन्हा आहे. तसेच विना नोंदणी वाहन न चालविणे सामाजिक दृष्टीकोनातून चांगले आहे. अशा प्रकारची वाहने चालवताना जर अपघात झाला तर संबंधित कुटुंबाला विमा मिळत नाही. त्यामुळे विना नोंदणी वाहन रस्त्यावर कोणीही चालू नये. जर अशा प्रकारचे कोणी उल्लंघन करत असेल तर त्या व्यक्तीला दंड करण्यात येईल तसेच कलम ३९ अक्ट नुसार असे वाहने आम्ही ताब्यात घेऊन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे जमा करणार आहोत. तसेच वाहनधारकांनी दंडाची रक्कम भरून नोंदणी करून घ्यावी. असे आवाहन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अविनाश ढेरे, पोलीस काॅन्स्टेबल प्रकाश जाधव, दिनेश गंगे, दत्तु बेलेकर, विजय सुपेकर, प्रविण पालवे, देवा पळसे, या पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!