जवळा येथे उपबाजार समिती सुरू करावी जवळा ग्रामपंचायतच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती कडे मागणी

0
276

जामखेड न्युज——–

जवळा येथे उपबाजार समिती सुरू करावी जवळा ग्रामपंचायतच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती कडे मागणी

जामखेड तालुक्यातील जवळा हे गाव मोठे असुन चांगली व्यापारपेठ आहे. आजुबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांची येथे मोठी वर्दळ असते म्हणून येथे उपबाजार समिती स्थापन करावी असे ग्रामपंचायत जवळा च्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड यांना पत्राद्वारे मागणी केली आहे.

बाजार समितीला दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि,
मौजे जवळा हे गांव तालुक्यातील सर्वात मोठे गांव असुन जवळा ही मोठी व्यापार पेठ असुन आजु बाजुच्या परीसरातील शेतक-यांची जवळा येथील बाजारपेठेत वर्दळ असते, जवळा परीसरातील सर्व शेतक-यांची जवळा येथे उपबाजार समीती व्हावी अशी खुप जुनी मागणी आहे. जवळा येथे उपबाजार समिती झाल्यास आमच्या भागातील सर्व शेतक-यांचा वेळ व पैशाची बचत होवुन शेतक-यांना त्याचा फायदा होईल. जवळा उपबाजार समीती साठी आपणांस आवश्यक असणारी जागा व आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जवळा ग्रामपंचायत आपणांस देण्यास तयार आहे.

यावेळी सभापती शरद कार्ले, संचालक सचिन घुमरे, माजी सभापती गौतम उतेकर, नंदू गोरे, राहुल बेदमुथा, सुरेश पवार, डॉक्टर ससाणे, विष्णू भोंडवे, डॉ गणेश जगताप, वैजनाथ पाटील, बबन हुलगुंडे, सचिव वाहेद सय्यद उपस्थित . तसेच जवळ्याचे सरपंच प्रशांत भाऊ शिंदे, उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर, युवा नेते राहुल पाटील, व्यापारी व ग्राम पंचायत सदस्य दया भाऊ कथले, ग्रामपंचायत सदस्य दीपक देवमाने, ग्रामपंचायत सदस्य अनिल हजारे, युवा नेते अमोल हजारे, शिवसेना युवा नेते नितीन कोल्हे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here