जामखेड न्युज——
सोनेगाव ते धनेगाव (धाकटी पंढरी) रस्त्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रस्तारोको आंदोलन करणार- अँड.डॉ.अरुण जाधव

आषाढी एकादशी निमित्त पायी दिंड्या रस्त्याने निघतात व धनेगावला त्याचा सामारोप दरवर्षी होत असतो. धनेगावला धाकटी पंढरी म्हणून ओळखले जाते. या वर्षी २९ जून २०२३ ला संविधान दिंडी निघणार आहे. मागच्या वर्षी खराब रस्त्यामुळे दिंडीकरांचे फार हाल झाले होते. पावसाळ्यामुळे सोनेगाव ते धनेगाव या 3 किमी रस्त्यावर चिखल झाल्याने दिंडीकरांना फार त्रास सहन करावा लागला होता. तसेच काही लोक चिखलामुळे घसरून पडून जखमी झाले होते.

या वर्षी पुन्हा दिंडीकरांचे हाल होऊ नये म्हणून सोनेगाव ते धनेगाव रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी.अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक २६/०६/२०२३ रोजी खर्डा या ठिकाणी अॅड.डॉ.अरुण (आबा) जाधव यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन मा. दादासाहेब पाटील दाताळ, विशाल पवार, गणपत कराळे ,शहानुर काळे यांनी दिले आहे अशी माहिती सचिन भिंगारदिवे यांनी दिली आहे.









