जामखेड न्युज——
युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव राहुल उगले यांची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बरोबर पक्षाच्या संघटनात्मक बांधणीविषयी चर्चा
प्रदेशाध्यक्ष लवकरच जामखेडला येणार
जामखेड येथील युवा नेते व युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव राहुल उगले यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बरोबर पक्षाच्या संघटनात्मक बांधणीविषयी चर्चा केली तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका तसेच विधानसभा निवडणुका संदर्भात सविस्तर चर्चा केली.
शनिवारी टिळक भवन, दादर,मुंबई येथे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले यांच्या समवेत युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव राहुल भैया उगले यांची बैठक झाली. यावेळी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीविषयी तसेच आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था,विधानसभा निवडणुकी संदभार्त चर्चा केली.
पक्षाच्या बांधणीसाठी लवकरात लवकर जामखेडला येण्याचे मान्य केले. प्रदेशाध्यक्ष जामखेडला आल्यामुळे काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात चैतन्य निर्माण होईल. असे बोलले जात आहे.
युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव राहुल उगले यांनी युवकांचे संघटन करत तळागाळापर्यंत पक्षाचे विचार व ध्येय धोरण पोहचवण्याचे काम उल्लेखनीय आहे. याच कामाची दखल घेत प्रदेशाध्यक्ष पटोले जामखेडला येत आहेत.