कांदा अनुदानासाठी त्रिसदस्यीय समितीचा अहवाल बाजारसमितीस सादर करावा – सभापती शरद कार्ले

0
193

जामखेड न्युज——

कांदा अनुदानासाठी त्रिसदस्यीय समितीचा अहवाल बाजारसमितीस सादर करावा – सभापती शरद कार्ले

माहे 01 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च मार्च 2023 या दोन महिन्याच्या कालावधी मध्ये अनुदान मिळणे करिता बाजार समितीस अर्ज सादर केलेल्या शेतक-यांनी 7/12 उता-यावरील पिक पेरा व शासकीय अधिका-यांचा संयुक्त पहाणी अहवाल तात्काळ कृषि उत्पन्न बाजार समिती जामखेडच्या कार्यालयात सादर करावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी केले आहे.


शेतक-यांना कांदा अनुदान मिळणे सुलभ होण्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समिती जामखेड़ चे
सभापती शरद पंडीत कार्ले यांनी आहवान केले आहे.

तरी शेतक-यांनी 7/12 उता-यावरील पिक पेरा याची नोंद तलाठी / ग्रामसेवक व कृषि सहाय्यक
या त्रिसदस्यीय समितीचा पहाणी अहवाल बाजार समितीस तात्काळ सादर करावा असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन करण्यात आले आहे. जेणेकरून कांदा अनुदान मिळण्यासाठी सुसुत्रता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here