पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त चौंडीत आमदार रोहित पवार यांच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आमदार रोहित पवार यांनी केले स्वागत

0
146

जामखेड न्युज——

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त चौंडीत आमदार रोहित पवार यांच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आमदार रोहित पवार यांनी केले स्वागत

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला काल रात्री चौंडी इथं क्षिप्रा, नर्मदा, गोदावरी, चंद्रभागा, रामेश्वर, तापी आणि कृष्णा या सात नद्यांचं पाणी आणि राज्याच्या विविध भागात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या बारवामधील कार्यकर्त्यांनी आणलेल्या पवित्र जलाने मतदारसंघातील जोडप्यांच्या हस्ते महापूजा आणि जलाभिषेक करण्यात आला. 

दुपारी अडीच वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता अहिल्यादेवी होळकर स्मारकाजवळ आमदार रोहित पवार यांनी त्यांचे स्वागत केले. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करुन अभिवादन केलं.

 


चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त २९८ फटाक्यांची एक तास नेत्रदीपक आतषबाजी करुन राज्यभरातील शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास अभिवादन केलं. यावेळी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कर्मभूमीतून उज्जैन येथून आणलेल्या हत्तीची चौंडीमध्ये पूजा करण्यात आली.

चौंडी येथील महादेवाचं मंदिर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक यावर नागरिकांनी आणि आपण सर्वांनी मिळून डोळ्यांचे पारणे फेडणारी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. अशा प्रकारे पहिल्यांदाच रात्री १२ वाजता सर्वांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करता आली, याचं आमदार रोहित पवार यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

चौंडीतील सीना नदीपात्रात ४१ हजार पणत्यांपासून (५० बाय ५० साईझ) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची थ्रीडी प्रतिकृती साकारून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीची अनोखी मानवंदना देण्यात आलीय. कलाकार उद्देश पघळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी साकारलेली ही प्रतिकृती.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र आळंदी येथील ह.भ.प. गडदे महाराज यांनी किर्तन सेवा बजावली. याचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला.

राज्याच्या व देशाच्या विविध भागातून चौंडीमध्ये येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून अगदी चोख प्रसाद व्यवस्था ठेवण्यात आली होती. रात्री दोन वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू होते तसेच आजही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे स्वागत आमदार रोहित पवार यांनी केले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here