खर्डा येथे पत्रकाराच्या हस्ते ध्वजारोहण, महावितरणच्या कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप

0
157

जामखेड न्युज——

खर्डा येथे पत्रकाराच्या हस्ते ध्वजारोहण,

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप

महाराष्ट्र दिनानिमित्त तालुक्यातील खर्डा येथील
३३ केव्ही महावितरण येथे खर्डा प्रेस क्लबचे अध्यक्ष तथा लोकमत प्रतिनिधी संतोष थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना टेस्टर व पक्कड भेट देण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे,वरिष्ठ तंत्रज्ञ नदीम पठाण,तंत्रज्ञ प्रभाकर सुरवसे, तंत्रज्ञ श्रीकांत शिंदे, तंत्रज्ञ विजय जोरे, उमेश कोरे, संतोष साबळे, प्रवीण गोलेकर ,किशोर साळवे ,डॉ सुरेश भोरे हे उपस्थित होते.

तसेच १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त व कामगार दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , रयत शिक्षण संस्थेचे खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा ,श्री संत गजानन महाविद्यालय, श्री छत्रपती कनिष्ठ महाविद्यालय, बँका, पतसंस्था, पोलीस स्टेशन , विविध शासकीय कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here