Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या अपघातग्रस्तांना मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची गुरू महाराजांनाही मदत ...

अपघातग्रस्तांना मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची गुरू महाराजांनाही मदत बीड वरून तातडीने पुण्यात उपचारासाठी हलवले

0
157

जामखेड न्युज——
अपघातग्रस्तांना मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची गुरू महाराजांनाही मदत

बीड वरून तातडीने पुण्यात उपचारासाठी हलवले

नेहमीप्रमाणे अपघातग्रस्तांना मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी अपघातग्रस्त पद्मावतीजी म.सा गुरू महाराजांना मदत करत त्यांना बीड येथून तात्काळ पुणे येथील रूग्णालयात नेवून तातडीचे उपचार करून घेतले.

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे नांदेडहून परभणीमार्गे जामखेडला येत असताना बीड – वडवणी दरम्यान पद्मावतीजी म.सा गुरू महाराजांना अपघात झाल्याचे त्यांच्या सहकारी गुरू महाराजांनी दुरध्वनी करून कोठारी यांना सांगितले. जैन महासतीजीं पद्मावतीजी म.सा गुरू महाराजांना रस्त्यावर चालत असताना मागून मोटरसायकल ची धडक बसल्याने परमपूज्य पद्मावतीजी म.सा. या गंभीर जखमी झाल्या. त्यात त्यांना डोक्याला मार लागतानाच,तीन ठिकाणी पाय फ्रक्चर झाला.


दरम्यान परमपूज्य पद्मावतीजी म.सा. यांना
पुढील उपचारासाठी बीड येथील आनंदऋषिजी डायगनोटिक सेंटर व रेणू हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले. यावेळी बीड येथील डॉ. किशोर कोटेचा,डॉ सुमित नहार,डॉ. पारसमल, डॉ कोटेचा, गौतम खटोड, मनोज कोटेचा, बाबुशेठ खिंवसरा, प्रेमचंद बोरा,जवाहर बोरा, संजय नहार, ॲड.भंडारी , श्री चिंचोलकर यांनी मदत केली.

दरम्यान पद्मावतीजी म.सा. यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे पुना हाॅस्पीटल येथे नेण्याचा निर्णय घेण्यात आला. तोपर्यंत संजय कोठारी हे बीडला पोहोचले. कोठारी यांनी पद्मावतीजी म.सा.यांना बीड येथून रुग्णवाहिकेत घेऊन स्वताच्या गाडीत उर्वरित तपस्वी गुरू महाराज यांना घेवून पुण्याला निघाले. जामखेडचे कोठारी यांचे मित्र रोहिदास केकान ,विठ्ठल परांडकर, सुमित मोजकर (बीड)यांना बरोबर घेत त्यांनी तातडीने पुणे गाठले. रात्री उशिरा पुण्यात पुना हॉस्पिटल येथे पद्मावतीजी म.सा. यांना ॲडमिट केले. याठिकाणी पुण्यातील आदेश खिवंसरा, बाळासाहेब धोका यांनी मोठी मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!