Friday, February 13, 2026
Home राजकारण जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आमदार प्रा. राम शिंदे व प्रा. सचिन...

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आमदार प्रा. राम शिंदे व प्रा. सचिन गायवळ यांच्यात खलबत

0
206

जामखेड न्युज——

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आमदार प्रा. राम शिंदे व प्रा. सचिन गायवळ यांच्यात खलबत

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती साठी सध्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. दोन्ही आमदारांनी कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे यात जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व प्रा. सचिन गायवळ यांची भुमिका महत्त्वाची ठरणार आहे. यानुसार रात्री उशिरा आमदार प्रा. राम शिंदे व प्रा. सचिन गायवळ यांच्यात बाजार समिती साठी चर्चा झाली आहे.

 


प्रा सचिन गायवळ जामखेडच्या राजकारणात काय भुमिका घेणार हा अनेक दिवसापासुन चर्चेचा असलेला विषय थांबण्याची शक्यता आहे. प्रा सचिन गायवळ यांची राजकीय भुमिका लवकरच होणार स्पष्ट प्रा आ राम शिंदे आणि प्रा सचिन गायवळ जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत एकत्र येण्याचे संकेत, तालुक्यातील हे दोन मोठे नेतृत्व एकत्र आल्यास जामखेड मधील राजकारणाचे समीकरण बदलणार.

 

प्रा सचिन गायवळ यांना मानणारा मोठा वर्ग जामखेड तालुक्याच्या सक्रीय राजकारणात कार्यरत आहे त्या मध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा समावेश आहे त्यामुळे प्रा सचिन आणि प्रा आ राम शिंदे एकत्र येऊन निवडणुक लढविल्यास कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीवर भारतीय जनता पार्टिच्या विजयावर शिक्कामोर्तब होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण यांचा प्रत्येक गावात युवा वर्गासोबत असलेला जनसंपर्क त्यामध्ये अनेक सरपंच, ग्रा पं सदस्य, सोसायटी चेअरमन, संचालकांचा समावेश आहे ही येणा-या निवडणुकीत फायद्याची बाब ठरणार आहे रात्री उशीरापर्यंत झालेल्या चर्चेत प्रा सचिन गायवळ यांनी कार्यकर्ते आणि समर्थकांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं सांगितल आहे


जामखेड तालुक्यात सध्याच्या राजकारणात स्थानिक नेत्यांमध्ये प्रा सचिन गायवळ हे असं नेतृत्व आहे की स्वबळावर तालुक्याच्या राजकारणात स्व:ताच अस्थित्व आहे, त्यांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे त्यामुळे प्रा आ राम शिंदे आणि प्रा सचिन गायवळ या दोघांनी सोबत येऊन निवडणुक लढवली तर निश्चितच फायदा होईल.

प्रा सचिन गायवळ यांचा जनसंपर्क मोठा आहे.
कोणाच्या तरी नेतृत्वात काम करत आहेत त्यामुळे स्वबळावर निवडणुकीचा निकाल बदलु शकतो असं स्व:त च अस्तित्व असलेला नेता आहे.

 

प्रा सचिन गायवळ यांची समर्थकांसोबत चर्चा झाल्यानंतरच बाजार समिती निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल आणि त्यानंतरच कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत खरी रंगत येईल

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत प्रा सचिन गायवळ यांची भुमिका निवडणुकीच्या निकालासाठी निर्णायक ठरू शकते असेही अनेक राजकीय जाणकारांचे मत आहे त्यामुळे प्रा सचिन गायवळ निवडणुकीत काय भुमिका घेणार याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे. माघार घेण्याच्या दिवशी २० रोजी चित्र स्पष्ट होईल. व किती पॅनल होतात याचे चित्र स्पष्ट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!