Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या माध्यमांची एकाधिकारशाही लोकशाहीसाठी घातक- एस. एम. देशमुख

माध्यमांची एकाधिकारशाही लोकशाहीसाठी घातक- एस. एम. देशमुख

0
150

जामखेड न्युज——

माध्यमांची एकाधिकारशाही लोकशाहीसाठी घातक- एस. एम. देशमुख

पत्रकारांच्या कितीही संघटना असल्या तरी समान प्रश्नांसाठी सर्वानी एकत्र आले पाहिजेत ग्रामीण भागातील पत्रकारांचे अनेक प्रश्न आहेत. पत्रकारांवर हल्ले वाढले आहेत. तसेच सरकारी मदत खुपच थोड्या पत्रकारांना मिळते. माध्यमे हे सरकारमधील काही नेत्यांनी विकत घेतले आहेत. यामुळे माध्यमाची एकाधिकारशाही वाढली आहे हे लोकशाहीसाठी घातक आहे. पत्रकारांच्या प्रश्नांसाठी सर्वानी एकत्र आले पाहिजे असे आवाहन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केले.


अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे राज्यातील तालुका पत्रकार संघांचा राज्यस्तरीय मेळावा आणि आदर्श तालुका व जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा ७ एप्रिल २०२३ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे झाले. या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत उपस्थित होते. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार या मेळाव्याचे स्वागताध्यक्ष होते.

यावेळी खासदार संजय राऊत, स्वागताध्यक्ष आमदार रोहित पवार, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, किरणजी नाईक, शरद पाबळे, संजय मिश्किल, परिषदेचे सरचिटणीस मन्सूर सय्यद, सुभाष गुंदेचा, संदीप कुलकर्णी, मिलिंद आष्टीकर, विजय जोशी, अनिल महाजन, अनिल वाघमारे, शोभाताई जयपूरकर, विठ्ठल लांडगे, नगराध्यक्ष उषा राऊत, कर्जतमधील पत्रकार गणेश जेवरे, निलेश दिवटे, आशिष बोरा, योगेश गांगर्डे, भाऊसाहेब तोरडमल, मच्छिंद्र अनारसे, मोतीराम शिंदे, अस्लम पठाण, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, अविनाश बोधले, अशोक वीर, किरण रेडे, पप्पूभई सय्यद, पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण, मिठुलाल नवलाखा, अशोक निमोणकर, संतोष गर्जे, अजय अवसरे,लियाकत शेख, सुर्यकांत नेटके, उपनगराध्यक्ष रोहिणी घुले यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना एस. एम. देशमुख म्हणाले की,
पत्रकारांच्या कल्याणासाठी मराठी पत्रकार परिषद नेहमी झटते. समान प्रश्नासाठी सर्वानी एकत्र यावे
आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून खुपच मोठा बदल मतदारसंघात झाला आहे. कायापालट होत आहे.

 

यावेळी राज्यातील विविध तालुका व जिल्हा पत्रकार पुरस्कार वितरण करण्यात आले

नागपूर विभाग : मोहाडी तालुका पत्रकार संघ जिल्हा भंडारा,
अमरावती विभाग : धामणगाव तालुका पत्रकार संघ, जिल्हा अमरावती,
लातूर विभाग : औढा नागनाथ तालुका पत्रकार संघ जिल्हा हिंगोली,
नाशिक विभाग : अमळनेर तालुका पत्रकार संघ, जिल्हा जळगाव,
पुणे विभाग : पुरंदर तालुका पत्रकार संघ जिल्हा पुणे,
कोल्हापूर विभाग : जत तालुका पत्रकार संघ, जिल्हा सांगली,
औरंगाबाद विभाग : पैठण तालुका पत्रकार संघ, जिल्हा औरंगाबाद,
कोकण विभाग : महाड तालुका मराठी पत्रकार संघ जिल्हा रायगड

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!