जामखेड न्युज——
अभ्यासू संचालक म्हणून ख्याती असलेले प्रा. महादेव डुचे यांचा जामखेड बाजार समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल
गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत आपल्या अभ्यासू वृत्तीने कामाचा ठसा उमटवलेले शेतकरी व व्यापारी यांना योग्य न्याय देणारे संचालक म्हणून ख्याती असलेले प्रा. महादेव डुचे यांनी मतदारांना बरोबर घेऊन सेवा संस्था मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
गेली दहा वर्षे त्यांनी जामखेड बाजार समितीचे संचालक म्हणून काम पाहिले आहे. एक अभ्यासू संचालक म्हणून त्यांची ख्याती आहे. तिसऱ्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी त्यांनी सेवा संस्था मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना गाजावाजा न करता जे मतदार आहेत त्यांना बरोबर घेत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
खुरदैठण सेवा संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत तसेच आपल्या कामाच्या बळावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे एक अभ्यासू संचालक म्हणून ख्याती मिळविली आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
जामखेड बाजार समितीची निवडणूक 18 जागेसाठी
यामध्ये कृषि पतसंस्था आणि बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदारसंघातून 11 सदस्य निवडले जाणार आहेत. या मतदारसंघात सर्वसाधारण 7, महिला राखीव 2, इतर मागास प्रवर्ग 1, विमुक्त जाती / भटक्या जाती 1 असे उमेदवार निवडले जाणार आहेत. तर ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी या मतदारसंघासाठी 4 जागा आहेत. यामध्ये सर्वसाधारण 2, अनुसूचित जाती जमाती 1 आणि आर्थिक दुर्बल घटक 1 असे सदस्य निवडले जाणार आहेत. व्यापारी / आडते मतदारसंघासाठी 2 जागा आहेत. हमाल/ मापाडी मतदारसंघासाठी 1 जागा आहे. असे एकुण 18 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी आर. एफ निकम हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत.
जामखेड बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम खालील प्रमाणे
उमेदवारी अर्ज दाखल करणे – 27 मार्च 2023 ते 3 एप्रिल 2023 ( वेळ – सकाळी 11 ते दुपारी 3) ठिकाण – निवडणूक कार्यालय
अर्ज छाननी – 5 एप्रिल 2023 ( सकाळी 11 वाजता) ठिकाण – निवडणूक कार्यालय
वैध अर्जाची यादी प्रसिद्ध करणे – 6 एप्रिल 2023 ( सकाळी 11 वाजता ) निवडणूक कार्यालय व संस्था नोटीस बोर्ड
अर्ज मागे घेण्याची तारीख – 6 एप्रिल 2023 ते 20 एप्रिल 2023 ( सकाळी 11 ते दुपारी 3) निवडणूक कार्यालय
चिन्ह वाटप – 21 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता ( निवडणूक कार्यालय व संस्था नोटीस बोर्ड)
मतदान – 30 एप्रिल 2023 ( वेळ सकाळी 8 ते 4 ) स्थळ नंतर घोषित करण्यात येईल
निकाल – 30 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता ( स्थळ व तारीख नंतर घोषित करण्यात येईल)
निकाल घोषणा – मतमोजणी दिवशी ठिकाण व निकाल तारीख जाहीर करण्यात येईल.