जामखेड न्युज——
धामणगाव येथे दोन गटात तुफान राडा अकरा जणांविरोधात खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल
तालुक्यातील धामणगाव येथील सोनारवाडा वस्ती येथे लाठ्या, काठ्या, कुऱ्हाड व ब्लेड यांचा वापर करून दोन गटात झालेल्या भांडणावरून दोन्ही गटातील ११ जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत सविस्तर असे की जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील धामणगाव येथील सोनारवाडा वस्ती येथे फिर्यादी दिलीप सखाराम महारनवर (वय ३०) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, आरोपी १)अंकुश रामभाऊ महारनवर,२)मधुकर रामभाऊ महारनवर ३)संचिन मधुकर महारनवर ४)मुक्ता मधुकर महारनवर,५)शोभा अंकुश महारनवर,६) आकाश अंकुश महारनवर ७) ज्ञानेश्वर उर्फ माऊली मधुकर महारनवर सर्व रा.धामणगाव ता.जामखेड..
यांनी गैरकायदाची मंडळ जमावुन फिर्यादी व त्याचे वडील यांना शिवीगाळ, दमदाटी करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. आरोपी अंकुश रामभाऊ महारनवर याने कुऱ्हाड मारुन जखमी केले. तसेच फिर्यादीची आई यांचा आरोपी नं १ याने विनयभंग केला तसेच आरोपी नं ७ याने फिर्यादीचे डाव्या हाताला ब्लेड मारुन जखमी केले. फिर्यादीस आरोपी क्र. १ ते ७ यांनी शिवीगाळ दमदाटी करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी १)अंकुश रामभाऊ महारनवर,२)मधुकर रामभाऊ महारनवर ३)संचिन मधुकर महारनवर ४)मुक्ता मधुकर महारनवर, ५)शोभा अंकुश महारनवर,६) आकाश अंकुश महारनवर ७) ज्ञानेश्वर उर्फ माऊली मधुकर महारनवर सर्व रा.धामणगाव या सात जणांविरुद्ध गु.र.नं. व कलम – 77 / 2023 भा.द.वी कलम 354, 324, 143, 147, 148, 149, 323, 504, 506, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या घटनेत फिर्यादी अंकुश रामभाऊ महारनवर रा. धामणगाव ता. जामखेड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्हा परिषद शाळा सोनारवाडा, धामणगाव येथे असताना आरोपी १) शशिकांत सखाराम महारनवर, २) दिलीप सखाराम महारनवर ३) नानासाहेब सखाराम महारनवर ४) सखाराम सूर्यभान महारनवर सर्व राहणार धामणगाव ता.जामखेड यांनी पैशाच्या कारणावरून फिर्यादी अंकुश रामभाऊ महारनवर रा.धामणगाव यास शिवीगाळ दमदाटी करून लाथा बुक्क्याने मारहाण केली आरोपी नंबर एक व दोन यांनी फिर्यादीस दगड व लाकडी काठीने महारण करून जखमी केले. आरोपी क्रमांक एक याने फिर्यादी यांचे पुतणे यास ब्लेडने मारून जखमी केले पैसे दिले नाही तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली यानुसार फिर्याद फिर्यादी अंकुश रामभाऊ महारनवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी १) शशिकांत सखाराम महारनवर, २) दिलीप सखाराम महारनवर ३) नानासाहेब सखाराम महारनवर ४) सखाराम सूर्यभान महारनवर सर्व रा. धामणगाव ता. जामखेड गु.र.क्र. व कलम 78/2023 भादवि कलम 324,323, 504, 506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील धामणगाव येथील सोनारवाडा वस्ती येथे दि. ३१ मार्च २०२३ रोजी सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास पहिली तर ९:३० वाजता दुसरी घटना घडली असल्याचे फिर्यादीत दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस.एस.जायभाये हे करत आहेत.




