कर्जबाजारीपणाला कंटाळून खुरदैठण येथील युवकांची आत्महत्या

0
195

जामखेड न्युज——

कर्जबाजारीपणाला कंटाळून खुरदैठण येथील युवकांची आत्महत्या

तालुक्यातील खुरदैठण येथील एका तरुण शरद शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन यात्रा संपविली. ही दुर्घटना २५ मार्च रोजी दुपारी घडली.शरद अमृत डूचे वय ४० असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.


खुरदैठण येथील शेतकरी शरद अमृत डूचे (वय ४० ) यांच्यावर सेवा सोसायटीचे दीड ते दोन लाखाचे कर्ज असल्याची माहिती समोर येत आहे कर्जबाजारीपणाला कंटाळून रहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच पोकॉ ज्ञानेश्वर भागवत यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.मृतदेहाचे जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मृताच्या पश्चात आई, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. कर्जाच्या ओझ्याने तरुण शेतकऱ्याने जीवन संपवल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.जामखेड पाेलिस ठाण्यात नाेंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here