जामखेड न्युज——
बायकोचे कुंकू पुसून वंचितचा वाघ कलावंतांच्या रक्षणासाठी मैदानात
जामखेड शहरात काही चुकीच्या माणसांमुळे जामखेडकरांचे जगणे मुश्किल झाले आहे. कधी पैशाच्या जीवावर तर कधी मनगटाच्या बळावर ही मंडळी गोरगरिबांना त्रास देत आहेत या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना न्यायालयातून निर्दोष सुटका मिळाली असली तरी समाजाच्या न्यायालयातून त्यांना सुटका नाही कलावंतांच्या रक्षणासाठी मी माझ्या बायकोचे कुंकू पुसून मैदानात उतरलो आहे असे प्रतिपादन वंचित बहुजन विकास आघाडीचे राज्य समन्वयक ॲड अरुण जाधव यांनी केले.
दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यानंतर या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपींकडून मलाही धमकी देण्यात आली आहे . मी या मोर्चाच्या निमित्ताने तुमच्या सर्व समक्ष बायकोच्या कपाळाचे कुंकू पुसले आहे. यापुढे त्यांची आणि आमची लागली. जेलमधून सुटल्यावर तू सांग तिथे मी येतो. 32 वर्ष झाले मी संघर्ष करतोय तो असाच नाही . यापुढे गुंडांचा त्रास कोणीही सहन करायचा नाही. आपण सर्वांनी मिळून एकजुटीने प्रतिकार करूया आणि या गुंड प्रवृत्तीच्या विरोधात आवाज उठवू
तीन दिवसांपूर्वी जामखेड शहरातील तीन कला केंद्रांवर गुंडांनी ‘खंडणी’ साठी ‘हैदोस’ घालून दहशत निर्माण केली. या घटनेच्या निषेधार्थ जामखेडचा कोल्हाटी समाज रस्त्यावर उतरला. शुक्रवारी (ता.२४) रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय मोर्चा काढून निषेध नोंदविला तर घटना घडल्यानंतर अवघ्या चोवीस तासाच्या आत पोलिसांनी खंडणीबहाद्दरांना गजाआड करुन दाखविलेल्या तत्पर्तेचे कौतुक केले. या घटनेमुळे भयबित झालेले समाज बांधव निषेध मोर्चाच्या निमित्ताने पहिल्यांदाच रस्त्यावर उतरला त्यांनी लोकशाही मार्गाने आपला प्रक्षोभ व्यक्त केला आणि घटनेचा निषेध नोंदविला.
यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी कायदा हातात घेणाऱ्याची गय केली जाणार नसल्याचे सांगून समाजातील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना जेरेबंद करण्याचे आश्वासन दिले.
तहसीलदार योगेश चंद्र यांनी तालुक्याच्या कायदा सुव्यवस्थेला ‘बाधा’ निर्माण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी प्रशासन तडीपार व मोका अंतर्गत कारवाई करील याकरिता ‘ प्रस्ताव’ हाती घेतला जाईल अशी ग्वाही दिली.
जामखेड शहरात ता.२१ मार्च रोजी तीन कला केंद्रांवर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी ‘खंडणी’ ची मागणी करीत धुडगूस घातला .त्याठिकाणी तोडफोड करून मालमत्तेचे नुकसान केले . लूट केली. त्या ठिकाणी असलेल्या महिलांना मारहाण केली. या घटनेचे पडसाद शहरातील अन्य कला केंद्रावर ही पोहचले. झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शहरातील सर्व कलाकेंद्रावरील नर्तिका व अन्य कलाकार, कलाकेद्र मालक आज रस्त्यावर उतरले . त्यांनी घडलेल्या घटनेचा निषेध लोकशाही मार्गाने मोर्चा काढून नोंदविला.
या मोर्चाचे नेतृत्व वंचित आघाडीचे राज्य समन्वयक ॲड. अरुण जाधव, नगरसेवक अमित जाधव , नगरसेवक गुलशन अंधारे, नरेंद्र जाधव यांनी केले. यावेळी त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मधुकर राळेभात , माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक, माजी नगराध्यक्ष विकास राळेभात , माजी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बबनराव तुपेरे, मनसेचे तालुकाप्रमुख प्रदीप टापरे, युवा नेते सनी सदाफुले, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष कुंडल राळेभात, वंचित आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सदाफुले , आदिवासी समाजाचे नेते विशाल पवार, ग्रामीण विकास केंद्राचे समन्वयक बापूसाहेब ओव्होळ, उमाताई जाधव , गीता जाधव यांनी पाठिंबा दिला. या हल्ल्याचा निषेध नोंदवित आपली भूमिका विषद केली.–
जामखेड शहरातील तीन कला केंद्रावर गुंडांनी खंडणीसाठी धुडगुस घालून लुटमार व नुकसान केल्याची फिर्याद जामखेड पोलिसात दाखल होताच अवघ्या काही तासात गुन्ह्यातील आरोपींचा शोध जामखेड पोलिसांनी घेतला आणि त्यांना गजाआड केले. त्यामुळे गुंडांचा सुरू झालेला आहे हैदोस तात्काळ थांबला. दरम्यान महेश पाटील हे पंधरा दिवसांपूर्वीच जामखेडला पोलीस निरीक्षक म्हणून हजर झाले आहेत. त्यांच्या समोर आल्या आल्याच गुंडगिरीचा बिमोड करण्याचे मोठे आव्हान समोर आहे.