जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटर मधुन आतापर्यंत जवळपास साडेपाच हजार कोरोना रूग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत तेही अगदी मोफत हा सर्व खर्च आरोळे हॉस्पिटलने केलेला आहे त्यामुळे त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे हि गरज ओळखून परिसरातील दानशूर व्यक्तींकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. संजय हजारे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघा व सौ. भिमा संजय हजारे जि.प.प्राथ.शाळा जगदाळेवस्ती उभयतांनी आपल्या लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसानिमित्त कोरोना रूग्णांवर मोफत उपचार करणार्या आरोळे कोविड सेंटरला पंचविस हजार रुपयांची मदत केली आहे.

हजारे पती पत्नी यांनी सुखी संसाराची रेशीमगाठीची २५ वर्ष आनंद सौख्यभरे पूर्ण केली.आनंदी क्षण असला तरी सामाजिक दुःख महत्वाचे आहे.कोरोना सारखे महाभयंकर संकट आणि त्या संकटावर संकटमोचन ग्रामीण आरोग्य प्रकल्प आरोळे कोविड सेंटर यांचे योगदान त्या करिता एक हात मदतीचा हे सामाजिक भान ठेवून लग्नाच्या पंचवीसव्या वाढदिवसानिमित्त २५ हजार रुपयांची मदत केली. मदतीचा चेक आरोळे कोविड सेंटरच्या अन्नपूर्णा म्हणून ओळख असलेल्या सुलताना शेख (भाभी) यांच्याकडे देण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, प्राथमिक जिल्हा संघाचे विकास बगाडे,
दोन्ही गुरूमाऊलीचे अध्यक्ष पांडुरंग मोहळकर व हनुमंत निंबाळकर, गुरूकुलचे अध्यक्ष विजयकुमार जाधव, शिक्षक नेते संभाजी जाधव, जामखेड तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष एकनाथ(दादा)चव्हाण, संजयजी हजारे व सौ.भिमा संजय हजारे यांच्या सह अनेक शिक्षक हजर होते.
यावेळी सुलतान भाभी यांनी हजारे दाम्पत्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व मदतीबद्दल हजारे यांचे आभार मानले तसेच महाराष्ट्र राज्य प्राथ.शिक्षक संघ,गुरूमाऊली मंडळ,महिला आघाडी,उच्चाधिकार समिती जामखेड यांनी हजारे दाम्पत्याचे आभार मानले व हजारे यांच्या सामाजिक दातृत्वाबद्दल समाजातील प्रत्येक घटकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

