जामखेड न्युज——
संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान करून शिवजयंती साजरी २१० रक्तदात्यांनी केले रक्तदान
संजय काशिद यांचा स्तुत्य उपक्रम – रमेश गुगळे
जाणता राजा संपूर्ण देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जामखेडमध्ये महिला अनोख्या पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे आयोजक रोहिणी संजय काशिद आहेत तर जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरात २१० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
उद्या महिला आयोजित भव्य दिव्य मिरवणूक व सायंकाळी धनंजय भाई देसाई यांचे व्याख्यान होईल
शिवसेनेच्या वतीने हे नववे वर्ष आहे तर महिला आयोजित शिवजयंतीचे हे दुसरे वर्ष आहे. गुरूवार दि. ९ रोजी दिवसभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जामखेड शहरातील लक्ष्म चौक (संविधान स्तंभ) येथे शिवजन्मोत्सव सोहळा माहिला समिती आयोजित शिवजयंती निमित्त मा.संजय (काका) काशिद मित्र परिवार यांच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. आज दि. ९ मार्च रोजी सकाळी १० वा. प्रसिद्ध उद्योगपती रमेशशेठ गुगळे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले तसेच भव्य रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. आजच्या रक्तदान साठी राजेंद्र जाधव (फिटर) व सौ. कूंदा राजेंद्र जाधव या दांम्प्त्याने सर्व प्रथम रक्तदानाला सुरवात केली.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक प्रसिद्ध उद्योगपती रमेश गुगळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्ति व बुध्दीच्या जोरावर स्वराज्य
उभे केले आहे तसेच शक्ति व बुध्दी बरोबरच त्यांच्या मनामध्ये “स्वराज्याची’ आस लागली होती, ज्यावेळेस आस निर्माण होते.
त्यावेळेस तुमच्या हातून भव्य – दिव्य कार्य होते. आपल्याला सर्वांची साथ मिळते. अशा प्रकारे निस्वार्थ भावनेतून आपण जे काम करत
असतो,त्यावेळेस यश नक्की मिळते. याचीच प्रेरणा घेत संजय काशिद हे समाजपयोगी असे रक्तदान शिबीर भरवतात. हे आजच्या काळाची गरज आहे. सध्या सर्वत्र रक्ताचा तुटवडा असून रक्तदान शिबिराच्या माध्यमातुन जनजागृती होत आहे. रक्त मिळाल्या ने एखाद्या चे प्राण वाचू शकतात व प्राण वाचवण्याचे भव्य दिव्य कार्य संजय काशिद हे
करत आहेत.
याप्रसंगी तालुका कृषि अधिकारी राजेंद्र सुपेकर, भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक बिभिषण धनवडे, डॉ. शशांक शिंदे, डॉ. अविनाश पवार,
कँप्टन लक्ष्मण भोरे, शहरप्रमुख गणेश काळे, सौ.रोहिणी संजय काशिद,दिपक टेकाळे, जुबेर पठाण, विशाल अब्दुले, मयुर भोसले सर,संजय बेलेकर, किरण मुळे, नाना रासकर, बाळासाहेब आरेकर भारत मोरे, सुरज काळे, अवि बेलेकर, चंदन अंधारे, किरण ओझर्डे, शंकर बोराटे, आण्णा काशिद, संतोष शिंदे, कैलास खेत्रे, सागर गुंदेचा,
अंगद चव्हाण, विजय काशिद, विशाल लोळगे, दिपक सुरसे आदी पदाधिकारी, कायकर्ते व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
या रक्तदान शिबीरासाठी सुरभी ब्लड सेंटर (विकास जरे) यांचे विशेष सहकार्य लाभले असून कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष मोहळकर यांनी केले.