जामखेड न्युज——
व्यापारी असोसिएशनच्या वतीने उद्या जामखेड बंदची हाक

जामखेड शहरातील पंचदेवालय ते सौताडा या राष्ट्रीय महामार्ग रोड अंतर तेवढेच ठेवावे परंतु इतर युटीलिटी व संबंधित डिव्हायडर एरिया हा कमी केला तर बहुसंख्य लोकांचा दैनंदिन जीवन विस्कळीत होणार नाही व व्यापार पेठ अबाधित राहील त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही म्हणून उद्या शनिवारी जामखेड बंदची हाक देण्यात आली आहे अशी माहिती आकाशजी बाफना यांनी दिली.
आज तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

काल शुक्रवारी सायंकाळी सर्वपक्षीय कार्यकर्ते व नेते यांची जामखेड 548 D अतिक्रमण संदर्भात मीटिंग पार पडली या या मीटिंगमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला व जामखेड शहरातील सर्व टपरीधारक व व्यापाऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही याकरिता त्रीव आंदोलन छेडण्याचा इशाराही जामखेड व्यापारी असोसिएशनने तर्फे देण्यात आला यावरच एकमत असा निर्णय झाला का येत्या शनिवारी दिनांक 11 मार्च 2023 रोजी जामखेड बंदची हाक देण्यात आली आहे.

तरी सर्व व्यापारी बंधू टपरीधारक व जामखेड शहरातील व्यापाऱ्यांवर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेला विनंती आहे आपण या बंदमध्ये सहभागी व्हावे व आपल्याच सोबत असणाऱ्या सर्व व्यापारी बंधू व टपरी धारकांना पाठिंबा द्यावा ही विनंती सदरील मीटिंगमध्ये प्रास्ताविक विनायक राऊत यांनी केले सदरील बैठक मध्ये मधुकर आबा राळेभात, अशोक काका शिंगवी, राजेंद्र काका कोठारी, युवा उद्योजक आकाश बाफना, सुरेश काका भोसले, गफ्फार भाई शेख, यांनी मार्गदर्शन केले.
सदरील बैठकीमध्ये व्यापार पेठेतील शरद शिंगवी, पिंटू बोरा, महावीर बाफना, संजय कोठारी, सुनील कोठारी, पवन राळेभात, संकेतजी ढाळे व व्यापार पेठेतील बहुसंख्य व्यापारी उपस्थित होते. सदरील बैठकीमध्ये एकच उद्देश आहे की रोड अंतर तेवढेच ठेवावे परंतु इतर युटीलिटी व संबंधित डिव्हायडर एरिया हा कमी केला तर बहुसंख्य लोकांचा दैनंदिन जीवन विस्कळीत होणार नाही व व्यापार पेठ अबाधित राहील असे सूचक आकाशजी बाफना यांनी केले इतर शनिवारी जामखेड बंदचे हाक व्यापारी असोसिएशन तर्फे करण्यात आला.