जामखेड न्युज——
प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर प्रतिकुल परिस्थितीवर मात करता येते – प्रा. अरूण वराट
आपल्याकडे प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कितीही प्रतिकुल परिस्थिती असली तरी तिच्यावर मात करता येते. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी जीवनात भविष्यातील ध्येय धोरण निश्चित करावे त्यानुसार प्रयत्न करावेत अडचण लहान असो किंवा मोठी असो त्यावर मात करत राजहंसा प्रमाणे जीवन जगा असा संदेश प्रा. अरूण वराट यांनी दिला
कोल्हेवाडी येथील जय हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा सदिच्छा निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे स्वीय साहाय्यक प्रा.अरूण वराट होते यावेळी सुनील भालेराव, नितीन मुरूमकर, भास्कर मुरूमकर, स्वाती गीरी, कदम सर, धेंडे मँडम, संदिप वराट यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा. अरूण वराट म्हणाले की, मनात दुर्दम्य इच्छा शक्ती असेल, तर या जगात अशक्य असे काहीच नाही. फक्त मी ते करणारच असा दृढ विश्वास मनात असायला हवा. विद्यार्थ्यांनी यशाच्या दिशेने वाटचाल करायला हवी. कठोर मेहनत व जिद्द मनात बाळगून यश संपादन करावे. असे प्रा. अरूण वराट यांनी सांगितले.
यावेळी शिक्षक सुनील भालेराव तर विद्यार्थी हरीओम कोल्हे, प्रशांत कोल्हे, तेजस कोल्हे, शितल कोल्हे, प्रतिक्षा कोल्हे, वर्षा कोल्हे यांनी मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेष्ठी यादव व अश्विनी कोल्हे यांनी तर आभार निकिता कोल्हे यांनी मानले