जामखेड शहरासाठी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे सांस्कृतिक सभागृहास पाच कोटींचा निधी मंजुरी आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला आले मोठे यश

0
172

जामखेड न्युज——

जामखेड शहरासाठी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे सांस्कृतिक सभागृहास पाच कोटींचा निधी मंजुरी

आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला आले मोठे यश

 

कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमांतून विकास कामांचा धडाका गतिमान झाला आहे. जामखेड शहरातील नागरिकांसाठी महत्वपूर्ण असलेल्या सांस्कृतिक सभागृहाचा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी शासन दरबारी जोरदार पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. जामखेड शहरासाठी 5 कोटी रूपये खर्चाच्या सांस्कृतिक सभागृहास सरकारने मंजुरी दिली आहे. तसा शासन निर्णय सरकारच्या नगरविकास विभागाने जारी केला आहे.

जामखेड शहराची 50 हजार च्या आसपास लोकसंख्या आहे. शहरातील नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी हक्काची जागा असावी अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने होत होती. या मागणीनुसार जामखेड शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रा राम शिंदे यांच्याकडे जामखेड शहरात भव्य दिव्य सांस्कृतिक सभागृह उभारावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती. आमदार राम शिंदे यांनी तातडीने या मागणीची दखल घेत शासन दरबारी पाठपुरावा हाती घेतला होता. अखेर या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.

आमदार प्रा राम शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे जामखेड शहरातील महत्वाचा प्रश्न आता निकाली निघाला आहे. नगरविकास विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत जामखेड नगरपरिषद क्षेत्रात लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे सांस्कृतिक सभागृहास मंजुरी मिळाली आहे. यासाठी 5 कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे. तसा शासन निर्णय 21 फेब्रुवारी रोजी नगरविकास विभागाने जारी केला आहे.

आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्यातून मंजुर झालेले लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे सांस्कृतिक सभागृह नागेश्वर मंदिरासमोर सुरु असलेल्या नव्या नगरपरिषदेच्या शेजारील जागेत होणार आहे. जामखेड भव्य दिव्य सांस्कृतिक सभागृहास आमदार प्रा राम शिंदे यांनी मंजुरी मिळवून आणल्याबद्दल भाजपा पदाधिकाऱ्यांसह जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here