जामखेड न्युज——
शिवनेरी किल्ल्यावरून आणलेल्या शिवज्योतीचे
जवळके गावच्या मिरवणुकीने जामखेड करांचे वेधले लक्षअधिकारी, सर्व पक्षीय नेते व सामाजिक कार्यकर्ते यांनी केले स्वागत

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील जवळके गावातील युवकांनी शिवनेरी किल्ल्यावरून शिवज्योत आणली होती. या ज्योतीचे व महाराजांच्या प्रतिमेचे रविवारी जामखेड शहरातील विंचरणा नदी ते चौफुला अशी सजवलेल्या रथात छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवीन पुतळा बसवून वारकरी राजा मावळ ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली. या मिरवणुकीत जवळके येथील शिवप्रेमींनी भगवे फेटे परिधान केले होते. शिवनेरी किल्ल्यावरून आणलेली पेटती मशालीची ज्योत व ढोल ताशांच्या गजरात सुमारे दोन तास चाललेल्या मिरवणूकीने जामखेडकरांचे लक्ष वेधले होते.
शिवज्योत व मिरवणुकीचे स्वागत सर्व पक्षीय नेते, अधिकारी तहसीलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ गायवळ, प्रा. सचिन गायवळ सर यांच्या सह अनेकांनी स्वागत केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवारी जामखेड शहरातील विंचरणा नदीच्या किनारी जवळके गावातील शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणला होता. सजवलेल्या रथात पुतळा बसवून शिवप्रेमींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर पुणे मावळ येथून आलेल्या ढोल पथकाने महाराजांना सलामी दिली. शंभर किलो वजनाची घंटा बडवून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूकीस सुरवात झाली. संविधान चौकात शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने मिरवणूकीचे स्वागत करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व मिरवणूक जवळके गावाकडे रवाना झाली.

शिवसेना तालुकाउपप्रमुख संतोष वाळुंजकर पाटील म्हणाले, तालुक्यातील जवळके गावात सर्व धर्म समभाव या पारंपारिक पध्दतीने चालत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातींना एकत्र करून स्वराज्याची स्थापना करून राज्य केले. त्यांच्या विचाराचे आचरण व्हावे व गावची एकजुट दाखवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व शिवप्रेमींनी जामखेड शहरातून मिरवणूक काढली आहे. यानंतर जवळके गावात मिरवणूक होऊन विठ्ठल मंदिरात छत्रपतींचा पुतळा ठेवण्यात येईल व दोन दिवस किर्तन व शिवव्याख्यान होऊन कार्यक्रमाची सांगता होईल असे संतोष पाटील म्हणाले.
याप्रसंगी शिवतेज ग्रुपचे अध्यक्ष सुग्रीव वाळुंजकर, जवळके सरपंच सुभाष माने, बाजार समितीचे संचालक पृथ्वीराज वाळुंजकर, संतोष पाटील, ऋषिकांत बोराडे बब्रुवान वाळुंजकर, कांतीलाल वाळुंजकर, दत्तात्रय दळवी, रामचंद्र वाळुंजकर, लक्ष्मण देशमुख, ज्ञानेश्वर वाळुंजकर, शंकर पाटील, राधाकृष्ण वाळूंजकर, दादा शेख ,गणेश चव्हाण , अमोल घाटे,शिवाजी वाळुंजकर, महेश माने,सागर मंडलिक, अंगद वाळुंजकर, बापू बोराडे, नितीन वाघ,बाळराजे माने औदुंबर माने, पै. महादू बोराडे, दादा पारखे आदी मिरवणूकीत सहभागी झाले होते.




